पश्चिम रेल्वेवरील तिकीटधारक प्रवाशांना आरामदायी प्रवास आणि चांगली सेवा देण्यासाठी लाेकल, मेल/ एक्स्प्रेस, प्रवासी रेल्वे आणि सुट्टीच्या विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी माेहीम राबवली जात आहे. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ वाणिज्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी पथकाने एप्रिल ते ऑगस्ट 2025 या कालावधीत अनेक माेहिमा राबवल्या. त्यामुळे 84.20 काेटी रुपये वसूल झाले. वातानुकूलित लाेकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 1.20 काेटींची दंडवसुली करण्यात आली.
पश्चिम रेल्वेने ऑगस्टमध्ये वसूल केलेल्या दंडाच्या वसुलीत लक्षणीय वाढ झाली आहे. तिकीट नसलेल्या 2.39 लाख प्रवाशांना शाेधून 13.21 काेटींची दंडवसुली करण्यात आली. त्यात आरक्षित न केलेल्या सामानाच्या प्रकरणाचा समावेश आहे. मागील वर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत त्यात 166 ट्नकेयांनी वाढ झाली आहे.
मुंबई उपनगरीय विभागातील सुमारे 88 हजार प्रकरणे शाेधून वसूल केलेल्या 3.44 काेटी रुपये दंडाचा त्यात समावेश आहे.वातानुकूलित लाेकलमध्ये तिकीट तपासणी माेहीम राबवली जाते. या माेहिमेमुळे एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत 36 हजारांहून अधिक अनधिकृत प्रवाशांवर कारवाई करून 1.20 काेटींचा दंड वसूल करण्यात आला. जाे मागील वर्षीपेक्षा 58 ट्नके जास्त आहे.पश्चिम रेल्वेवरून राेज 1406 लाेकल फेऱ्या धावतात. या फेऱ्यांमधून सुमारे 30 लाख प्रवासी प्रवास करतात; तसेच पश्चिम रेल्वेवर सध्या 109 वातानुकूलित लाेकल फेऱ्या धावतात. यामधून राेज सरासरी 1.26 लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, गर्दीचा फायदा घेऊन अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. अशा प्रवाशांना राेखण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.