म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 149 दुकानांच्या ई-लिलावासाठी नाेंदणी, अर्जविक्री-स्वीकृती, बाेली लावणे अशी प्रक्रिया 12 ऑगस्टपासून सुरू आहे.मात्र, या दुकानांच्या ई-लिलावासाठी अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने मुंबई मंडळाने या प्रक्रियेला मुदतवाढ दिली हाेती. आता ही मुदत 10 सप्टेंबरला संपणार असतानाच मंडळाने पुन्हा काही दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता इच्छुकांना 8 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरून 10 सप्टेंबरला लिलावात सहभागी हाेता येणार आहे.या मुदतवाढीमुळे 11 सप्टेंबरला जाहीर हाेणारा ई-लिलावाचा निकाल आता 19 सप्टेंबर राेजी जाहीर हाेणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार इच्छुकांना https:// eauction.mhada.gov.in संकेतस्थळावर नाेंदणी व अर्ज करणे, कागदपत्रे जमा करणे, संगणकीय पद्धतीने अनामत र्नकम भरणे ही प्रक्रिया 16 सप्टेंबरला रात्री 11.59 पर्यंत करता येईल. 10 सप्टेंबरपर्यंत अर्जदारांना बाेली लावता येणार असून, 19 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता https://eauction.mhada.gov.in d https://mhada.gov.in या दाेन्ही संकेतस्थळांवर ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार आहे.