जागतिक वारसा स्थळ कास पठारावर विविधरंगी फुलांचा हंगाम सुरू हाेत असल्याने पर्यटकांची पावले कासकडे वळू लागली आहेत. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या कास पुष्पपठारावर रंगीबेरंगी फुलांचे आगमन हाेण्यास सुरुवात झाली आहे.वन विभाग व कास पठार कार्यकारी समितीच्या वतीने हंगामाची अधिकृत सुरुवात करत चालू हंगामाचे उद्घाटन उपवनसंरक्षक अमाेल सातपुते, सहायक वनसंरक्षक प्रदीप राैंदळ, वनक्षेत्रपाल संदीप जाेपाळे, समिती अध्यक्ष संताेष आटाळे, उपाध्यक्ष विजय वेंदे यांच्यासह सर्व सदस्य, वनपाल, वनरक्षक, वनमजूर, सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत झाले.पहिल्याच दिवशी दिवसभरात ऑनलाइन, ऑफलाइन मिळून शेकडाे पर्यटकांनी कासला भेट दिली. फुलांच्या वाढीसाठी पाेषक वातावरण असल्याने कास पठारावर काही प्रकारची फुले तुरळक प्रमाणात बहरून येत्या काही दिवसांतच गालीचे पाहावयास मिळणार आहेत. गेंदला चांगल्या प्रकारे बहर आहे.
पर्यटकांना सुरक्षितता व सुखसुविधा देण्यासाठी वन विभाग व कार्यकारिणी समितीकडून सुरक्षारक्षक व गाइडची नेमणूक करण्यात आली आहे.सध्या पठारावर टूथब्रश, दीपकांडी, चवर, पंद, अभाळी, भुईकारवी, साेनकी, तेरडा या फुलांना तुरळक स्वरूपात बहर आला असून, पठारावरील फुले पर्यटकांना आकर्षित करू लागली आहेत.पठारावरील गेंद, सीतेची आसवे, चवर, कुमुदिनी फुलांना बहर आला असून, उर्वरित इतर फुलेही बहरण्यास सुरुवात झाली आहे. पर्यटक माेठ्या संख्येने कासला भेट देऊन येथील निसर्गसाैंदर्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत.पठारावर एकूण 132 जणांना राेजगार उपलब्ध हाेत असून, महिला स्वयंसेविकाही कार्यरत आहेत. यामुळे वनसंपदेचे संरक्षण, पर्यटकांना साेयीसुविधा, स्थानिकांना राेजगार मिळणार आहे. फुले पाहताना पर्यटकांनी येथील दुर्मीळ फुलांची काळजी घ्यावी. हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा वनक्षेत्रपालांनी दिला आहे.