जीवनात भावनिक मजबुती कशी आणावी?

    07-Aug-2025
Total Views |
 

thoughts 
 
बहुतेकांना स्वत:ची तुलना इतरांशी करण्याची वाईट खाेड असते.आपल्यापेक्षा श्रीमंताला पाहून ते आपल्या स्थितीचे दु:ख करीत राहतात.त्यांना वाटते की इतर सुखी आहेत कारण त्यांच्या जीवनात आव्हाने नाहीत.वास्तविक अडचणी साऱ्यांच्याच जीवनात असतात. फरक एवढाच असताे की ते माघारी परतणे जाणतात.महत्त्व जीवनात येणाऱ्या आव्हानांना नसते. ती तर येणारच. आपण त्यांना ताेंड देत कसे पुढे जात राहता याला महत्त्व असते. मानसशास्त्रज्ञ याला भावनिक लवचिकता म्हणतात. प्रसंगानुसार वागणे भावनिक लवचिकतेच्या श्रेणीत येते. पण आव्हानांचा सामना करताना एखाद्या सामान्य सल्ल्याच्या तुलनेत हे जास्त गूढ आहे. सातत्याने प्रयत्न करीत राहण्याची भावना संकट, अपयश आणि अपमानाच्या दंशाकडे दुर्लक्ष करवते.
 
आपण इतरांकडून प्रेरणा घेण्यास तत्पर राहात असताे. बहुधा हे दुसरे स्वत:ला इतरांपेक्षा उत्तम स्थितीत मानणारे असतात. पण आपल्या भावनिक लवचिकतेला परिपक्वता देण्यासाठी व पुन्हा भक्कमपणे उभे राहण्यासाठी आपण स्वत: प्रयत्न करायला हवेत. सतत स्वत:वर संशय नकाे जेव्हा आपण या स्वाभाविक प्रक्रियेत बाधक हाेप लागताे तेव्हा अडून बसताे.दीर्घकाळपर्यंत नेहमी स्वत:बाबत प्रश्न उभे केल्यामुळे आपला स्वाभिमान खालावू लागताे. आपल्या जीवनात काेणतेही लक्ष्य उरत नाही आणि आपण आपल्या समस्यांमध्ये एवढे गुंतून जाताे की इतरांसाेबत त्यांच्या त्रासात उभे राहू शकत नाही. यामुळे आपण इतरांचे भावनिक सहकार्य व साथही गमावून बसताे.कशी येईल भावनिक मजबुती भावनिक लवचिकता प्राप्त करण्यासाठी आपण हे समजायला हवे की यासाठी काय गरजेचे आहे. लाेक आपली भावनिक लवचिकता खालील माध्यमांनी दर्शवतात.
 
 ते आपल्या भावना स्वीकारतात.
 स्वत:बद्दल प्रश्न निर्माण करीत नाहीत.
 त्यांच्यामध्ये उच्च स्वाभिमान असताे.
 त्यांच्या जीवनाचा उद्देश स्पष्ट असताे.
 ते सतत दुसऱ्यांना मदत करतात व गरज असल्यास दुसऱ्यांची मदतही घेतात.
 
तसा यातील काेणताही पाॅइंट चमत्कारी नसून हे सारे एका अशा मानसिकतेचा भाग आहेत ज्यात माेकळ्या मनाने आणि मेंदूने स्वीकारण्याचे विचार येत असतात. पण सर्वप्रथम आपल्या भावना स्वीकारणे अत्यंत महत्त्वाचे असते.एक डाॅ्नटर सांगतात, डाॅ्नटरांच्या नात्याने स्तन कॅन्सरवर आधारित एका शाेधाने ते खूपच प्रभावित हाेते.त्या शाेधात सर्व रुग्णांना उत्तम उपचार उपलब्ध करवले गेले. रुग्णांचा एक गट नियमितपणे आपल्या डाॅ्नटरांना भेटे व सर्व उपचारांसंबंधित सूचना पाळत असे. तेच दुसरा गट आठवड्यातून एकदा भेटून त्यांना भावनिक रुपात कसे जाणवते हे सांगत असे. दाेन्ही गटांपैकी दुसऱ्या गटातील रुग्ण जास्त दीर्घकाळ जिवंत राहिले. भावनिक चढ-उतार येत-जात राहतात. पण जेव्हा हे स्वाभाविक चक्र आपण सहजतेने स्वीकारताे तेव्हा भावनिक लवचिकतेची अवस्था प्राप्त करून घेताे. हाच आपल्या उत्तम जाणीवेचा आधार आहे. यामुळेच आपण आपल्या अडचणीतही मजबूतपणे उभे राहू शकताे.