पण पाण्याच्या पातळीवर ज्या लाटा उमटतात त्या अगदी दूरवर जाऊ लागतात.दगड तर तळाला कधीच जाऊन बसताे, या लाटा अशाच अगदी सतत जात राहतातअनंताकडे.असेच आपल्या कर्माचं असतं. आपले करणे तर लगेच संपून जाते. आपण शिवी दिली, शिवी देणे चटदिशी संपून पण जाते. आपल्याला वाटते, ‘सगळा मामला संपून गेलाय.’ आपण पुन: गीता वाचायला घेतली, पण त्या शिवीच्या रिपल्स्, ज्या लाटा तयार झाल्या त्या निघाल्या आपल्या प्रवासाला. त्या कुठपर्यंतच्या कानाकाेपऱ्यात पाेहाेचतील याचा काही हिशेब आहे का? आणि त्या शिवीमुळे जेवढे अहित हाेईल तेवढ्या साऱ्याला जबाबदार आपणच ठरता. की दुसरा काेणी? आपणाला वाटते एका शिवीने कितीसे अहित हाेईल? पण प्रत्यक्षात अकल्पनीय अहित हाेत असते.