वाच्यार्थ : संकटप्रसंगी गरज पडेल म्हणून धनसंचय करावा, त्याचे रक्षण करावे. श्रीमंतांच्या बाबतीत असे म्हटले जाते की, त्यांच्यावर संकटे येतच नाहीत; पण लक्ष्मी चंचल आहे, आज आहे तर उद्या नाही.अर्थात संचय करून ठेवलेली धनसंपदा देखील नष्ट हाेऊ शकते.
भावार्थ : येथे धनाचे महत्त्व विशद केले आहे.संकटप्रसंगी मदत म्हणून सर्वांनीच धनसंचय करावा, संकट निवारण्याच्या हेतूने धनरक्षा करावी. गरीब तथा श्रीमंतसर्वांसाठीच हे आवश्यक आहे. सर्वसामान्य समज असा आहे की, श्रीमंतांवर संकटे येतच नाहीत; (म्हणजे आलीच तर पैशामुळे लगेच त्याचे निवारण हाेऊ शकते.) परंतु हा समज चुकीचा आहे. वैभवलक्ष्मी चंचल असते. ती केव्हा साेडून जाईल हे सांगता येत नाही.भारतात ब्रिटिश राजवट हाेती. त्यावेळी ब्रिटिश म्हणत, ‘‘ब्रिटिश साम्राज्यावरील सूर्य कधी मावळणारच नाही.
’’ शेवटी त्यांच्या वर्तनाने आणि अवाजवी आत्मविश्वासामुळे ‘ताे’ ढळलाच. त्यांना भारत साेडून जावेच लागले. धनाढ्य व्य्नती अशीच उन्मत्त, घमेंडी असेल तर पैसा ‘फेकला’ की, काहीही मिळते, असे म्हणते. अशा स्थितीत सात पिढ्यांना पुरणारे धन सात दिवसही टिकत नाही आणि व्य्नतीचे दिवाळे निघते.शेवटी ‘उद्याेगाचे घरी रिद्धी-सिद्धी पाणी भरी’, हीच म्हण खरी. विचारवंत धनिक धनाला लक्ष्मी (देवी) म्हणून पूजताे.धन व्यापार- उद्याेगात लावून परिश्रमाने त्याची वृद्धी करताे.याेग्य गाेष्टींसाठी पैशांचा वापर करताे. त्यामुळे त्याच्याकडील लक्ष्मी (परिश्रमाने) स्थिर राहते.
बाेध : धन मिळवून त्याचा जपून वापर करावा. संचय करावा म्हणजे लक्ष्मी स्थिर राहते आणि आपत्ती आल्यास धनामुळे स्वरक्षणही करता येते.