शरीराचा जाे भाग उन्हाच्या संपर्कात येत नाही तिथे हे जास्त हाेते. या इन्फे्नशनने सर्वांत जास्त रिंगवार्म हाेतात.इन्फे्नशन राेखण्यासाठी फ्लुकाेनाजाॅलचे लाेशन दिले जाते. यापासून वाचण्यासाठी त्वचा काेरडी ठेवा आणि अँटीफंगल पावडरचाच वापर करा. या माेसमात खाण्या-पिण्याच्या पदार्थांवरही याचा प्रकाेप दिसून येताे. ते जेवणासाेबत शरीरात गेल्यास रक्तात याचे संक्रमण पसरू शकते. त्यानंतर उपचार करणे खूप त्रासाचे हाेते. यासाठी दक्षता बाळगा.
अॅलर्जी : माेसम बदलल्यास अॅलर्जीच्या मुख्य रूपात दमा, ए्निझमा व अॅलर्जिक राइनारायटिस या तीन राेगांची समस्या वाढते. ज्यांना पहिल्यांदाच अॅलर्जी झाली असेल त्यांनीत्वरित डाॅ्नटरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. ज्यांना पूर्वीपासून असेल त्यांनी औषध घेण्यात कुचराई करू नये.
जुलाब : या माेसमात जुलाबाच्या समस्या वाढतात. बॅ्नटेरिया अमिबाचे इन्फे्नशन हे याचे मुख्य कारण आहे.या राेगात जास्त त्रास शरीरातील पाणी व इले्नट्राेलाइट बाहेर पडल्यामुळे हाेताे. यामुळे किडन्या व आतडी फेल हाेऊ शकतात. हे मुख्यत्वे दूषित पाणी प्याल्यामुळे हाेते. हे टाळायला हवे.या दिवसांत घरातील सर्वांनी पाणी उकळूनच प्यावे. खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. जर जुलाब बॅ्नटेरियामुळे हाेत असतील तर अँटीबायाेटिकचा वापर हाेत असताे. जर अमिबामुळे हाेत अअसतील तर मेट्राेनिडाझाॅलचा वापर हाेताे. शाैचास पातळ वा सामान्य रूपात दिवसातून तीनपेक्षा जास्त हाेत असतील, तर ते डायरियाचे लक्षण असते. अशा वेळी पाणी कमी पडू नये म्हणून भरपूर पाणी प्यावे. ओआरएसचा वापर करावा. जर समस्या गंभीर अअसेल म्हणजेच जेव्हा रुग्ण ओआरएसही पिऊ शकत नसेल, तेव्हा सलाइन चढवावे लागते.
टायफाॅइड : याचे जंतू शाैचाद्वारे पसरतात. गावात लाेक उघड्यावर शाैच करतात, ज्यामुळे ते पसरतात. शहरात जर पिण्याच्या पाण्याचे पाइप आणि शाैचाचे पाइप जवळून जात असतील व गळत असतील तर त्यामुळेही हा राेग पसरताे.यामुळे टायफाॅइड हाेत असताे.अर्थात हा लवकर बरा हाेत नाही. ताप सकाळी कमी व रात्री जास्त असताे व चार आठवडे राहू शकताे. पहिल्या आठवड्यात ताप जास्त राहात नाही.दुसऱ्या आठवड्यात ताे गंभीर हाेऊ शकताे. जर दुसऱ्या आठवड्यात पूर्ण उपचार केले नाहीत, तर तिसऱ्या आठवड्यात आतडी फाटू शकतात वा इन्फे्नशन ब्रेनपर्यंत पाेहाेचू शकते. याची तपासणी विडाल टेस्टने हाेते.