अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज

    06-Aug-2025
Total Views |
 

Pawar 
राज्य शासन व टाटा समूहाच्या वतीने येथे काैशल्यवर्धन केंद्र हे शिक्षणाचे नवे दालन उभारण्यात येत आहे. हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून पुढील वर्षी मेपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल. आज जवळपास सर्वच क्षेत्रात एआयचा वापर हाेत आहे.त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आगामी काळात आवश्यक ठरणार आहे. या केंद्रातून मिळणाऱ्या प्रशिक्षणाचा लाभ जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी, तसेच उद्याेग व्यावसायिकांनी घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले.
टाटा, एमआयडीसी व राेहा नगर परिषदेच्या विद्यमाने आणि खासदार सुनील तटकरे यांच्या पुढाकाराने राेहा येथील टाटा संचलित काैशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन करताना पवार बाेलत हाेते. यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. राजीव साबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भाेसले, जिल्हा पाेलीस अधीक्षक आचल दलाल, अपर जिल्हाधिकारी सुनील थाेरवे, जिल्हा शल्य चिकित्सक निशिकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित हाेते.
 
या प्रकल्पामुळे राेहा व रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी, तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्याेगांना फायदा हाेणार असून, त्याद्वारे अत्याधुनिक प्रशिक्षण मिळाल्यानंतर माेठ्या प्रमाणावर राेजगार निर्मिती हाेणार आहे. विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना नवकल्पना आणि काैशल्य विकासाद्वारे उद्याेगात कुशल संसाधने आणि उद्याेजकता निर्माण करणे या प्रमुख उद्दिष्टांना यातून चालना मिळणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.राेह्यातील काैशल्यवर्धन केंद्र हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्ह्यातील ज्या गावांचे गावठाण भूमापन हाेऊन नकाशे व मालमत्ता पत्रक तयार करण्यात आले आहे, सनदा तयार झालेल्या आहेत, अशा गावांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात पाच लाभार्थ्यांना स्वामित्व सनदेचे पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
प्रधानमंत्री आवास याेजनेंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ या याेजनेनुसार अि