लहान बाळाच्या मेंदूचा विकास असा करा

    06-Aug-2025
Total Views |
 

baby 
 
लहान बाळाच्या संगाेपनात केसांना तेल लावण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे.विशेषतः डाेक्याला तेल लावणे हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जाताे.बाळाच्या मेंदूचा विकास अतिशय नाजूक आणि संवेदनशील टप्प्यावर असताे आणि म्हणूनच डाेक्यावर लक्षपूर्वक हात फिरवून तेल लावणे हा केवळ साैंदर्यवर्धक उपाय नसून ताे आराेग्यवर्धक आणि मेंदूच्या विकासास पाेषक ठरताे. जेव्हा डाेक्यावर साैम्यतेने तेल लावले जाते, तेव्हा त्याद्वारे बाळाच्या मेंदूला अप्रत्यक्ष मसाज मिळताे. या साैम्य स्पर्शामुळे मेंदूच्या विविध भागांना रक्तप्रवाह सुरळीत मिळताे आणि त्यामुळे न्यूराॅनच्या वाढीस चालना मिळते. डाेक्याला लावले जाणारे तेल, जसे की खाेबरेल,बादाम किंवा तीळ तेल, यामध्ये असलेले पाेषक घटक त्वचेतून शाेषले जातात.ही तेलं त्वचेच्या पेशींना पाेषण देतात आणि उष्णतेपासून डाेक्याचे संरक्षण करतात. टाळू म्हणजे बाळाच्या डाेक्यावरील मऊ भाग, जाे जन्मानंतर काही महिन्यांपर्यंत उघडा असताे.
 
हे टाळू म्हणजे हाडे पूर्णपणे बंद न झालेला भाग. यामुळे मेंदूचा विकास माेकळेपणाने हाेऊ शकताे. हळूहळू हाडांची वाढ हाेत गेली की ही जागा बंद हाेऊ लागते, ज्याला टाळू भरते असे म्हणतात. टाळू भरणे ही नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया असून, त्यावर काेणत्याही उपचाराची आवश्यकता नसते. मात्र डाेक्याला नियमितपणे याेग्य पद्धतीने तेल लावल्याने ही प्रक्रिया सुलभ हाेते आणि डाेक्याच्या हाडांचे विकास याेग्य दिशेने हाेताे.याशिवाय, तेल लावताना बाळाशी हाेणारा स्पर्श, संवाद आणि डाेळ्यांतून हाेणारा संपर्क हाही बाळाच्या भावनिक विकासाला चालना देताे. त्यामुळे डाेक्याला तेल लावणे ही केवळ शारीरिक देखभालीपुरती मर्यादित नसून मानसिक, भावनिक आणि मेंदूच्या विकासासाठी उपयुक्त अशी संपूर्ण प्रक्रिया ठरते. या सगळ्याचा विचार करता, लहान बाळाच्या डाेक्याला नियमितपणे साैम्यतेने तेल लावणे ही एक आयुर्वेदिक आणि वैज्ञानिक दृष्टीकाेनातून उपयुक्त अशी जुनी परंपरा आहे, जी आजही तेवढीच महत्त्वाची आहे.