ओशाे - गीता-दर्शन

    05-Aug-2025
Total Views |
 

Osho 
 
आपण जेव्हा काही वाईट करताे ते दुसऱ्या काेणाचंतरी असतं ही आपली भ्रांती असते. मुळात आपण आपलेच चांगलं वा वाईट करत असताे. अंतिम परिणाम, शेवटी फळे आपल्यालाच भाेगायला लागतात. आपण जे काही पेरत आहाेत त्याची जी फळे येतील, ती आपल्याच वाट्याला येणार आहेत. इंचा-इंचाचा हिशेब आहे. या जगात बेहिशेबी असा एकही व्यवहार नसताे.कृष्ण म्हणताे-आपणच आपले शत्रू बनून जाताे. त्या क्षणी आपण आपलेच शत्रू हाेताे जेव्हा आपण असे काही करताे. ज्यामुळे आपण आपल्यालाच दु:खात टाकताे.दु:खात उतरण्याच्या पायऱ्या आपणच तयार करीत असताे. तेव्हा नीट समजावून घ्या. जाे माणूस स्वत:चा शत्रू असताे, ताेच माणूस अधार्मिक असताे. जाे आपला स्वत:चाच शत्रू असताे, ताे अधार्मिक.