जेवणानंतर ब्रश केल्याने दंतआराेग्य चांगले राहते

    05-Aug-2025
Total Views |
 
 
 
 
Health
राेज जेवल्यानंतरही खाण्याचे क्रेविंग हाेण्यामागे सायकाेलाॅजिकल आणि बायाेलाॅजिकल, दाेन्हीही कारणे असतात. आपले पाेट भरलेले असूनही मेंदू दुसरेच काहीतरी खाण्याचा सिग्नल देत असताे. यामागे अनेक कारणे जबाबदार असतात. बरेचदा लाेक बाेअर हाेत असतात किंवा स्ट्रेसमध्ये असतात, तेव्हाही कम्फर्ट फूड म्हणजेच काहीतरी गाेडसर आणि चटपटीत खाण्याचे त्यांना क्रेविंग हाेते. बरेचदा डिनरमध्ये हाय कार्बचे म्हणजे चपाती, भात आणि शुगर फूड जसे की खीर, शिरा इत्यादी खाल्लेले असेल तरीही ब्लडशुगर स्पीक झाल्यानंतर क्रॅश हाेते, परिणामी पुन्हा काहीतरी खाण्याचे क्रेविंग हाेऊ लागते.बरेचदा रात्री रेग्युलरली काहीतरी खाण्याची सवय पडते, तर बाॅडी त्या वेळी हंगर सिग्नल पाठवून देत असते, भलेही तुम्हाला वास्तविक भूक लागली असेल किंवा नसेल.
 
बरेचदा डिनरमध्ये प्राेटीन आणि फाइबरने भरपूर आहार खाल्ला नसेल, तरीही पाेट भरलेले असूनही समाधान मिळत नाही आणि काहीतरी खाण्याचे क्रेविंग सुरू हाेऊन जाते.रात्री जेवल्यानंतर ब्रश करून घेतल्यास क्रेविंग कंट्राेलमध्ये येण्यामागे विज्ञान आणि सायकाेलाॅजी दाेन्ही काम करतात. जेव्हा आपण ब्रश करताे, तेव्हा मेंदूला सिग्नल मिळताे की आता खाणे संपले आहे. याने शरीर आणि मेंदू दाेन्ही रिलॅक्स हाेऊन जातात आणि काहीतरी खायचे आहे असे क्रेविंग करत नाहीत.ब्रश केल्यानंतर टूथपेस्टची स्ट्राँग टेस्ट ताेंडात येते, म्हणून त्यानंतर गाेड किंवा नमकीन खाण्याचे एवढे मन हाेत नाही. ब्रश करणे हा एक स्लिप-रुटीन सिग्नलदेखील असताे. म्हणून ब्रश केल्यानंतर बाॅडी स्लीप-माेडमध्ये जाते आणि हंगर हार्माेन अ‍ॅक्टिव्हिटी धिमी पडते.
 
म्हणून जर रात्री जेवल्यानंतरही क्रेविंग हाेत असेल, तर ब्रश करण्याचे चालू ठेवा आणि ब्रश केल्यानंतर झाेपी जावे. असे केल्याने खाण्याचे क्रेविंग बराेबर तुमचे एक फिक्स स्लीप-शेड्युलही बनेल आणि तुम्हाला झाेपही चांगली येईल.क्रेविंग कंट्राेल करण्यासाठी एवढे लक्षात ठेवा डिनरमध्ये प्राेटीन आणि फायबरने भरपूर आहार जसे की डाळ, भाजी, सॅलड, पनीर घ्यावे. क्रेविंग हाेत असेल तर बडीशेप खाण्याचे किंवा हर्बल टी किंवा मग काेमट पाण्यात लिंबाचा रस टाकून हे प्यायचे चालू ठेवा. असे असूनही काही खायचे असेल तर थाेडे राेस्टेड चणे, मखाना किंवा ड्रायफ्रूट्स खाऊ शकता. जेवताना टीव्ही पाहणे किंवा माेबाइल स्क्राेलिंग करण्याचे टाळून फक्त भाेजनावरच लक्ष द्यावे.