पद्मश्री डॉ. शंकर महादेवन यांनी गायलेले ‌‘बाप्पा मोरया‌’ गाणं प्रकाशित

    04-Aug-2025
Total Views |
 
 p
 
पुणे, 3 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
पद्मश्री डॉ. शंकर महादेवन यांच्या सुमधुर आवाजात रेकॉर्ड झालेलं ‌‘बाप्पा मोरया‌’ हे गाणं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार; तसेच युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. या गाण्याची निर्मिती अमोल घोडके आणि श्रीनिवास कुलकर्णी यांनी केली असून, हे गाणं संपूर्ण महाराष्ट्रातील गणेशभक्तांसाठी एक भक्तिपूर्ण सांस्कृतिक भेट ठरेल. या गाण्याच्या माध्यमातून हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणपतीची परंपरा जपणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचा जयघोष करण्यात आला आहे.
 
p 
 
पारंपरिक श्रद्धा आणि आधुनिक संगीताचा संगम साधणाऱ्या या गीतात गणेशोत्सवाचे वैभव प्रभावीपणे उभे राहिले आहे. या गाण्याला शंकर महादेवन यांचा सुमधुर स्वर लाभला असून, शैलेशचंद्र लोखंडे यांनी गीतलेखन तसेच संगीतबद्ध केले आहेत. संगीत संयोजन अवी लोहार यांनी केले असून, रिदम नागेश भोसेकर आणि नितीन शिंदे यांनी केले आहे. गाण्याला भक्तिरसात रंगवण्यासाठी अभिषेक शिंदे, रविराज काळे, समिहान सहस्त्रबुद्धे आणि मनोहर नारवडे यांनी कोरस गायनातून योगदान दिले असून, या गीताचे मिक्सिंग अजिंक्य ढापरे यांनी केले आहे. गाण्याच्या प्रकाशनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुनीत बालन यांनी ‌‘बाप्पा मोरया‌’ या गीताला शुभेच्छा दिल्या.