पुणे, 2 ऑगस्ट (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पुणे यांच्या वतीने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढून त्याचा उपयोग उत्तम नोकरी-व्यवसाय करण्यासाठी व्हावा यासाठी ‘गुरुकुल’ स्किल सेंटर नुकतेच सुरू करण्यात आले. या उपक्रमांतर्गत 1 ऑगस्टपासून सुरू झालेल्या पहिल्या बॅचमध्ये महाराष्ट्रातून सुमारे 28 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर नोकरीची हमी देण्यात आली आहे. सुरेश कुलकर्णी व यामिनी मठकरी यांनी याचे आयोजन केले आहे.
याद्वारे समाजातील विद्यार्थ्यांना मोफत करिअर मेंटॉरशिप, व्यावसायिक मार्गदर्शन दिले जाणार असल्याचे महासंघ, पुणे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत महासंघाकडून कम्युनिकेशन स्किल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, महिलांसाठी ब्यूटीपार्लर कोर्सेस, कॉम्प्युटर कोर्सेस घेण्यात येणार असून, त्यामुळे नोकरी-व्यवसाय उभारण्यास स्वावलंबी होण्यास मदत होईल.