केस गळत नाहीत; पण वाढतही नाहीत...

    03-Aug-2025
Total Views |

Health 
आपले केस गळत नसतील पण त्यात वाढही हाेत नसेल, तर त्याचे कारण तणाव असू शकते. याशिवाय आपले खाणे-पिणे याेग्य नसल्यामुळे केसांना पाेषणही मिळत नसेल. हार्माे नल संतुलनात गडबड, तणाव वा दीर्घ आजारामुळे औषधे घेणे हेसुद्धा याचे कारण असू शकते. तसेच केसांची व्यवस्थित देखभाल न केल्यामुळेही केसांची वाढ हाेत नाही.तणावाचा बहुतांशी परिणाम हार्माेनल प्रणालीवर हाेत असताे.हार्माेनल बदल हाेऊ लागल्यानंतर त्याचा परिणाम केसांवर दिसून येताे.
 
केस मजबूत आणि दाट करण्यासाठी तणाव कमी करणे आवश्यक आहे. यासाठी नियमित व्यायाम करा. संगीत ऐका, ध्यान-याेगाभ्यास करा. कमीत कमी आठ तास झाेप घ्या. सामाजिक जीवनापासून स्वत:ला दूर ठेवू नका. नियमितपणे व्हिटॅमिन घ्या.केसांची चांगल्या प्रकारे देखभाल करा. आठवड्यातून दाेन वेळा केसांना शांपू व कंडीशनर करा.केस जेव्हा पातळ व कमकुवत हाेतात, तेव्हाही ते उगवताच तुटतात. केस जाड करण्यासाठी आठवड्यातून दाेन वेळा काेमट तेलाने आपल्या डाे्नयाची हळूहळू मालीश केल्यामुळे केसांची वाढ हाेते. आवळा केसांसाठी चांगला आहे. यासाठी आवळ्याचा रसही प्या; पण एकदा त्वचाराेग विशेषज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.