गणेशाेत्सव जवळ आला तरी कल्याण-डाेंबिवली महापालिकेच्या दहा प्रभागांतील ठेकेदार खड्डेदुरुस्ती करत नाहीत. त्यामुळे पालिका आयु्नत अभिनव गाेयल यांनी रस्ते खड्डेभरणी करणाऱ्या ठेकेदारांची ऑनलाइन बैठक घेतली. दिवस रात्र कामे करून शहरातील रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करा अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.प्रत्येक प्रभागातील अभियंत्यांनी ही कामे विहित वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी ठेकेदारांकडे पाठपुरावा करावा. कामात हलगर्जीपणा दिसला, तर कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशी तंबी आयु्नतांनी अभियंता आणि अधिकाऱ्यांना दिली.
शहरातील सिमेंट काँक्रीट रस्तसाेडले, तर सर्व डांबरी रस्त्यांची खड्ड्यांमुळे वाताहत झाली आहे. या रस्त्यांवरून वाहने चालवणेही अवघड झाले आहे. आता गणेशाेत्सव दाेन दिवसांवर आला आहे. तरीही ही खड्डे भरणीची कामे महापालिका ठेकेदारांकडून करण्यात येत नसल्याने नागरिक संताप व्य्नत करत आहेत.आयु्नतांनी दहा प्रभाग हद्दीतील खड्डेभरणी ठेकेदारांची मते जाणून घेतली.येत्या दाेन दिवसांत रस्ते सुस्थितीत करण्यासाठी अधिकची यंत्रणा आणा, वाढीव मनुष्यबळ वापरा आणि कामे तातडीने पूर्ण करा. दिवसा काम करण्यात अडथळे येत असतील, तर रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ कमी झाल्यावर ही कामे पूर्ण करा, असा सल्ला त्यांनी दिला.