संवाद साधणे हि देखील एक कला आहे, कधीही बघा मार्केटिंग क्षेत्रातील माणस हि बडबड्या स्वभावाची असतात म्हणूनच ती माणसे आपली वस्तू व त्याचा उपयाेग समाेरच्याला पटवून देण्यात यशस्वी ठरतात, पण हेच काैशल्य सर्वांकडे असेलच असे नाही. अगदी भिकारी देखील त्याचे संवाद काैशल्य वापरून थाेडेफार पैसे स्वतःच्या पदरात पाडून घेताेच कि नाही?
संवाद ही एक कला आहे. कुठल्याही कामाच्या ठिकाणी किंवा कंपनीमध्ये वरच्या पदांवर जाल तसतशी संवाद कला आणखीनच महत्वाची ठरते. म्हणून आपलं उद्दिष्ट आता जरी नाेकरी मिळवणं असलं तरी आपलं ध्येय माेठं असलं पाहिजे आणि त्यामुळे संवाद कलेकडे पहिल्यापासून लक्ष पुरवलं त्याचा पुढे नक्की उपयाेग हाेईल.
स्वतःशी संवाद हा खूप महत्वाचा आणि गरजेचा असताे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण हाच संवाद नेमका करायला विसरताे आणि त्यामुळे आपल्याला नेमकं काय करायचं आहे, कशाने आनंद मिळताे, आपल्या संवादात काय चुका हाेतात, कशा सुधारल्या पाहिजेत आणि अशा अनेक गाेष्टींवर आपण स्वतःशीच संवाद करून विचारच करत नाहीत आणि त्यामुळे आपल्या बाह्यसंवाद प्रक्रियेवर वाईट परिणाम हाेऊ शकताे. म्हणून ही प्रक्रिया महत्वाची आहे.
संवाद साधताना तुमची देहबाेली व्यक्त व्हायला हवी. हावभावांमधून तुमच्या व्यक्तिमत्वातील खुलेपणा जाणवते. उभे राहण्याची ढब, हातांच्या हालचाली, हसणे, डाेळ्यांतील भाव यातूनही समाेरच्या व्यक्तीशी संवाद साधला जाताे. बाेलताना अस्पष्टता टाळा. तुम्हांला जे काही म्हणायचे आहे ते सुस्पष्ट पद्धतीने बाेला. चाचपडत बाेलू नका. शांतता बाळगणे हे एक साधन आहे. बाेलताना सहेतुक पाॅज घ्या. याेग्य भाषा वापरा. उगाचच शपथा घेऊन किंवा उद्धटपणे बाेलू नका. अर्वाच्य भाषेच्या वापरातून सकारात्मकता दिसून येत नाही. उलट त्यातून तुमचा तिरसट स्वभाव, असमंजस वृत्ती आणि बेजबाबदारपणा दिसून येताे. बाेलताना तुमच्या टाेनवर लक्ष द्या.
नेहमी मध्यम टाेनमध्ये बाेलावे. माेठ्या आवाजात, आक्रस्ताळेपणाने बाेलल्यामुळे समाेरच्या व्यक्तीवर किंवा श्राेत्यांवर प्रभाव पाडता येत नाही. उलट तुमच्याकडे काहीच मुद्दे नसल्याचे ते लक्षण असते. तुमचा आवाज खूपच मृदू असला तर तुम्ही काहीतरी लपवत असल्याचा समज हाेऊ शकताे. खाली पाहून वेगाने बाेलू नका. एक मुद्दा वारंवार िफरवून िफरवून बाेलून नका.
बाेलण्यात आक्रस्ताळेपणा असू नये किंवा समाेरच्या व्यक्तीचा अंदाज घेत चाचपडत बाेलू नका.