मुंबई, 22 ऑगस्ट (आ.प्र.) : शासनात अधिकारी म्हणून काम करताना नागरिकांची सेवा प्रामाणिकपणे करावी.
शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य आपल्या हातून घडावे, असा दृष्टिकाेन बाळगण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागात महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाकडून समाजकल्याण अधिकारी (गट-ब) पदावर निवड झालेल्या 22 अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या कार्यक्रमात नियु्नतीपत्र प्रदान करण्यात आले. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राष्ट्रीय मागासवर्ग आयाेगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डाॅ. हर्षदीप कांबळे, समाजकल्याण आयु्नत दीपा मुधाेळ-मुंडे, संत राेहिदास चर्माेद्याेग व चर्मकार विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे; तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते. शासकीय सेवेत आल्यामुळे आपल्यावरील जबाबदारी वाढली आहे. नागरिकांप्रति प्रामाणिक राहून नागरिकांची सेवा करण्याचे काम आपल्या हातून हाेणार आहे. या संधीचे आपण साेने करावे, असे आवाहन शिरसाट यांनी केल