चाणक्यनीती

    23-Aug-2025
Total Views |
 
चाणक्यनीती
 
वाच्यार्थ : नखे असणारे हिंस्त्र पशू, नदी, टाेकदार शिंगाचे प्राणी, शस्त्रधारी मानव आणि राजकुळातील व्य्नती व स्त्री यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नये.
 
भावार्थ : ज्यांच्यापासून धाेका संभवताे त्यांच्यापासून सावध राहण्याविषयी सांगितले आहे.
 
1. हिंस्त्र पशू - परमेश्वराने वाघ, सिंह या हिंस्त्र पशूंना आपले भक्ष्य मिळविण्यासाठी तथा स्व-रक्षणासाठी तीक्ष्ण नखे दिलेली आहेत. असे पशू शिकार करताना किंवा आजारी असताना काेणालाही इजा करू शकतात किंवा प्राण घेऊ शकतात. म्हणून त्यांच्याजवळ जाऊ नये.
आपण सर्कशीत अशा प्राण्यांचे खेळ पाहताे; परंतु सामान्य परिस्थितीत रिंगमास्टरच्या तालावर नाचणाऱ्या पशूंनी विशिष्ट परिस्थितीत त्याचाच घास केल्याचीही उदाहरणे आहेत.
 
2. नदी - नदी म्हणजे जीवनदायिनी! पाण्याशिवाय जीवसृष्टीच राहू शकणार नाही. (क्रमश:)