भोर येथील शिवाजी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा वर्ग 40 वर्षांनंतर पुन्हा भरला

    23-Aug-2025
Total Views |
 
 bha
 
भोर, 22 ऑगस्ट
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
भोर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या 1985च्या दहावीच्या बॅचचे स्नेहसंमेलन शनिवारी (16 ऑगस्ट) शाळेत संपन्न झाले. या प्रसंगी 40 वर्षांपूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांचा वर्गच पुन्हा भरल्यासारखे चित्र निर्माण झाले होते. या संमेलनाला विविध ठिकाणी स्थायिक विद्यार्थी; तसेच त्या काळातील अहिरे सर, मेहेर सर, काळे सर असा शिक्षकवर्ग व सध्याचे प्राचार्य राऊत सर उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला खुर्च्या भेट दिल्या.
 
यामध्ये संजय भालघरे, नथू बाठे व रामदास मगर यांनी मोलाचे सहकार्य केले. मनोहर बाठे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. रामदास मगर यांनी सूत्रसंचालन, तर पाहुण्यांचे स्वागत अरुणा महागरे यांनी केले. संगीता मांडके व मीना काकडे यांच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. हेमलता जगताप यांनी पाहुण्यांचा सत्कार केला, तर नरेंद्र धोंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.