नांदेड, 21 ऑगस्ट (आ.प्र.) : मागील पाच ते सहा दिवसांपासून संपूर्ण राज्यात सतत पाऊस पडत आहे.
त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचेही माेठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने तात्काळ पूर्ण करावेत, असे निर्दे श कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. हदगाव तालुक्यातील करमाेडीस भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. आमदार बाबूराव काेहळीकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत व परिसरातील शेतकरी उपस्थित हाेते.
पाच ते सहा दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे संपूर्ण राज्यात प्राथमिक अंदाजानुसार 20 लाख 12 हजार एकर शेतीचे नुकसान झाले आहे. यात एकट्या नांदेड जिल्हृयात 2.59 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणच्या शेतातील माती वाहून गेली आहे, तर पशुधनाचेही माेठे नुकसान झाले आहे.
अनेक घरांत पाणी शिरले असून, घरांची पडझड झाली आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे प्रशासनाच्या वतीने सुरू केले आहेत. लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल प्राप्त हाेताच त्यांना शासनाच्या वतीने भरपाई देण्यात येईल, अशी ग्वाही भरणे यांनी दिली.