चाणक्यनीती

    22-Aug-2025
Total Views |
 
चाणक्यनीती
 
आचार, विचार, संस्कार समान असले, तर जीवनप्रवास सुकर हाेताे.पतिगृही गेल्यानंतर पत्नीला पतीच नव्हे, तर त्याचे संपूर्ण कुटुंब, आप्त, मित्र या साऱ्यांच्या सुखासाठी झटावे लागते. कुळाच्या मानमर्यादेचेही भान ठेवावे लागते. संततीचे उत्तम संगाेपन करून घराण्याच्या प्रतिष्ठेत भर घालावी लागते. हे सर्व फ्नत सुशांत, सुविचारी, सुशील स्त्रीच करू शकते. रूपाने ती डावी असली तरी त्याने काही बिघडत नाही; कारण ‘दिसण्यापेक्षा’ ‘असणे’ महत्त्वाचे.
 
रंग-रूपाचा प्रभाव फ्नत पाहताक्षणी; पण वागण्या- बाेलण्याचा प्रभाव मात्र कायमस्वरूपी असताे; कारण सुंदर, परंतु नीच, कपटी, दुष्ट, घातकी, स्वार्थी, लाेभी, रागीट, चंचल, कुणाचाच विचार न करणारी स्त्री पतीला, सर्वांनाच त्रास देईल.

बाेध : दाेन विभिन्न कुळातील (येथे ‘कूळ’ म्हणजे ‘संस्कार’) विवाह नेहमी ्नलेशदायी ठरताे.