चाणक्यनीती

    21-Aug-2025
Total Views |
 
चाणक्यनीती
 
ज्यात वेळ, प्रयास, परिश्रम केवळ वायाच जातात आणि मिळताे ताे केवळ मनस्तापच! बाेध : संत कबीर म्हणतात, ‘सहज मिले साे दूधसम’ - म्हणजेच ‘थाेड्यात गाेडी’ असते. (समाप्त) वाच्यार्थ : विवाह म्हणजे जीवनातील सर्वांत माेठी गाेष्ट आहे. विवाह ठरविताना नेहमी आपल्याप्रमाणेच संस्कार असलेल्या मुलीची निवड करावी. सुंदर; परंतु मलिन, हीन विचारांच्या मुलीपेक्षा, रूपहीन; परंतु कुलवती (गुणी, सुसंस्कारी) मुलीलाच पसंती द्यावी. यातच समजूतदारपणा आहे.
 
भावार्थ : विवाह हा समान कुळात व समान आचार, विचार असणाऱ्या जाेडीदारासाेबतच करावा. विवाह म्हणजे दाेन जिवांचा (पती-पत्नी) सहप्रवास, स्त्री-पुरुषांची जन्मभराची साथ असते. त्यासाठी त्यांचे मनाेमीलन हाेणे आवश्यक आहे. एकमेकांना त्यांनी समजून घ्यावे, यासाठी विवाह हा समान कुळांमध्ये हाेणे जरूरी आहे. (क्रमश:)