मुलांनाे, तुम्ही लाखेचा वापर करून तयार केलेली खेळणी पाहिली आहेत का? विशेषत: प्रदर्शननात अशी खेळणी माेठ्या प्रमाणात पाहायला मिळतील. लाखेपासून खेळणी व इतर कलात्मक वस्तू काेठे तयार केल्या जातात ते पाहू या.झाडापासून लाख काढून त्याच्या रंगीत वस्तू बनवण्याची कला भारतीयांना प्राचीन काळापासून माहीत आहे. पंजाब, म्हैसूर, बनारस, गुजरात येथे बऱ्याच ठिकाणी लाखेचे रंगीत काम माेठ्या प्रमाणात चालते.दुसऱ्या चितारकाम पद्धतीत वस्तू गाेल आकाराच्या नसल्या तरी चालतात. प्रथम लाकडावर रंगीत चित्रे काढून घेतात. नंतर लाकूड गरम करून त्यावर लाखेचे पातळ पाणी देतात. त्या लाखेमुळे रंग पक्के राहून त्यांना चकाकी येते. लाखेपासून तयार केलेल्या वाॅर्निशचा चकाकी आणण्यासाठी उपयाेग हाेताे.
अशाप्रकारे चितारलेल्या पेट्या, गंजीफा, फळे, खेळणी ही सावंतवाडी, साखेडा, जयपूर, बनारस या ठिकाणी हाेतात. लाखेची रंगीत खेळणी तयार करण्यासाठी हल्नया वजनाचे लाकूड लागते. हे लाकूड म्हैसूरच्या जंगलात भरपूर मिळते. त्यामुळे तिथे खेळणी बनवण्याचा छेदा माेठ्या प्रमाणात चालताे. भारतात आणि परदेशांतही म्हैसुरी खेळणी माेठ्या प्रमाणात विकली जातात. बडाेद्याजवळ साखेडा गावी साेनेरी लाख व रंगीत कला फार कलात्मक असते. छाेटा उदेपूर येथून लाख व लाकूड मुबलक मिळते, साेनेरी नक्षी उठून दिसण्यासाठी कल्हईचा रस तयार करून लाकडावर वेलबुट्टी काढतात. सावंतवाडीचा गंजिफा एके काळी सर्व देशांमध्ये प्रसिद्ध हाेत्या.