कामाची डेडलाईन पाळताना...

    02-Aug-2025
Total Views |
 

thoughts 
 
जाॅब करा अथवा करू नका, मात्र तुमची प्रतिष्ठा ही तुम्ही तुमच्या कामाबाबत किंवा एखाद्या प्रकल्पाची डेडलाईन किती कार्यक्षमतेने गाठता यावर अवलंबून असते.तुमच्या कामाची गुणवत्ता, टीमबराेबर करण्याची प्रवृत्ती या सगळ्या गाेष्टी मधूनच डेडलाईन गाठणे श्नय हाेते. एखादी व्यक्ती सर्वाेत्तम कर्मचारी आणि काैशल्यवान असू शकते परंतु तिला वेळेची शिस्त पाळून डेडलाईन गाठता आली नाही आणि प्रकल्प पूर्ण करण्याची कालमर्यादा उलटून गेली तर त्या व्यक्तीला विश्वासार्ह मानले जात नाही.त्यामुळे काैशल्या बराेबरच तुमच्याकडे वेळेची शिस्त पाळण्याचे कसब असायलाच हवे. आज आपण कितीही धकाधकीचे जीवन जगत असलाे तरी देखील वेळेची शिस्त पाळणे याला पर्याय नाही.
 
डेडलाईन का चुकते? गुणवत्तापूर्ण काम करणे आणि ते वेळेत पूर्ण करणे या दाेन्ही गाेष्टी महत्त्वाच्या असतात. तुम्ही खूप गुणवत्तापूर्ण काम करता, मात्र ते वेळेत करत नसाल तरत्या गुणवत्तेचा काहीही उपयाेग हाेत नाही.कारण तुम्हाला जेव्हा एखाद्या प्रकल्पावर नेमण्यात आलेले असते आणि त्या प्रकल्पाची डेडलाईन ठरलेली असते तेव्हा तुमच्या कामावरूनच कंपनीची प्रतिष्ठा देखील ठरणार असते. दुर्दैवाने प्रत्येकाला वेळेचे व्यवस्थापन कार्यक्षमतेने करता येत नाही. त्यामुळे डेडलाईन करताना प्रचंड संघर्ष करावा लागताे.
 
तणावाखाली काम करावे लागते. वेळेच्या ढिसाळ व्यवस्थापना साेबतच मनमानी कालमर्यादा, एकाचवेळी अनेक प्रकल्पांचा बाेजा, अत्यंत मनुष्यबळ, मर्यादित साधनसामग्री अशा अनेक कारणांमुळे डेडलाईनचे उल्लंघन हाेते.अशावेळी आपण आपल्या प्रत्येक कामाचं याेग्य व्यवस्थापन करणे गरजेचे ठरते.कामाचा वेग आणि वेळेचा अंदाज एखादा प्रकल्प हाती घेतल्यानंतर त्या प्रकल्पाच्या राेजच्या कामाची प्रगती व डेडलाईन गाठण्यासाठी त्या कामाची गती काय असायला हवी हे निश्चित केले पाहिजे.