हार्ट अ‍ॅटॅकमध्ये सुरुवातीचे तास महत्त्वाच

    02-Aug-2025
Total Views |
 
 

Health 
देशभरात हार्ट अ‍ॅटॅकचे पेशंट खूप वेगाने वाढत आहेत. आधुनिक जीवनशैली आपल्या हृदयावर खूपच परिणाम करते. हृदयाच्या बाबतीत थाेडासा निष्काळजीपणाही घातक ठरू शकताे. जर हार्ट अ‍ॅटॅक आल्यानंतर पेशंटला याेग्य वेळी याेग्य इलाज मिळाले, तर त्याचे जीवन वाचविता येऊ शकते.पण, थाेडासा निष्काळजीपणा सुद्धा त्याच्या मृत्यूचे कारण ठरू शकताे. म्हणून हार्ट अ‍ॅटॅकनंतर सुरुवातीचे तास अतिशय महत्त्वाचे मानले जातात.हृदयात र्नतपुरवठा तीन धमन्यांद्वारे हाेताे. जर काही कारणांनी या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला, किंवा धमन्यांमध्ये र्नतपुरवठा एकदम बंद झाला, तर त्याला हार्ट अ‍ॅटॅकची स्थिती म्हटले जाते; आणि जर त्या स्थितीत हृदयाच्या धमन्यांमध्ये र्नताभिसरणाची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू केली नाही, तर पीडित व्य्नतीचा मृत्यू हाेऊ शकताे. किंवा हृदयाची पंपिंग क्षमता कमी हाेऊ शकते.
 
र्नतपुरवठा बंद झाल्यानंतर एक तासाच्या आत जर र्नतपुरवठा सुरळीत केला नाही तर हृदयाचे स्नायू मृत हाेऊ लागतात. त्यापेक्षा जास्त उशीर झाल्यास आपल्या हृदयाच्या दुसऱ्या भागांनाही नुकसान पाेहाेचते. हेचकारण आहे की, आपण या सुरुवातीच्या तासांचे महत्त्व समजून घ्यावे आणि पेशंटला लवकरात लवकर हाॅस्पिटलमध्ये पाेहाेचवावे.त्यामुळे मृत्यूचे प्रमाण खूप कमी केले जाऊ शकते. आणखी आवश्यक हे आहे की, प्रत्येक हाॅस्पिटलमध्ये एक चेस्ट सेंटर स्थापन केले जावे. त्यामुळे जेव्हा कधी पेशंटमध्ये काेणत्याही प्रकारे तक्रार किंवा लक्षणे आढळली, तर त्याच्या हृदयाची तपासणी केली जाईल.
 
बहुतांश पेशंट्समध्ये नियमित लक्षणे जसे छातीत वेदना न हाेता अनियमित लक्षणे असतात. जसे हार्ट अ‍ॅटॅकच्या आधी अपचनाची तक्रार हाेणे. ही लक्षणे बहुतांश महिलांमध्ये दिसून येतात. या सर्वलक्षणांना पाहता त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यानंतर व्य्नती जनरल फिजिशियनकडे जाताे.डाॅ्नटरही त्याला सामान्य समस्या मानून केवळ औषधे लिहून देतात. डायबिटीसनी पीडित पेशंटला हार्ट अ‍ॅटॅक आल्यास खूप कमी वेदना हाेतात. इथेच चेस्ट पेन सेंटरची गरज असते. आधी पेशंटच्या हृदयाची तपासणी केली जायला हवी. देशात वाढणारी हार्ट अ‍ॅटॅकची संख्या पाहता, हे आवश्यक आहे की, प्रत्येक व्य्नतीने आपले राहणीमान आणि आहार यांची पूर्ण काळजी घ्यावी. नियमित व्यायाम करावा.