तुम्ही दिसायला हाॅट आणि आकर्षक आहात का? ब्युटीुल पीपल डाॅट काॅम या वेबसाईटने अमेरिकेतील लाॅसएंजेलिसमध्ये क्लब असून त्याठिकाणी फक्त हाॅट आणि आकर्षक व्यक्तींनाच प्रवेश दिला जाताे. एखादी व्यक्ती आकर्षक आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी परीक्षक नेमण्यात आले असून त्यांच्या निर्णयावर प्रत्येकाचा क्लबमधील प्रवेश अवलंबून असताे. भारतात या डेटिंग साईटने अद्याप मेंबरशिप देण्यास सुरवात केलेली नाही.ब्युटीुल पीपल हे डेटिंग वेबसाईट असून त्या साईटवर जाॅईन हाेणाऱ्या नव्या सदस्यांची प्रथम पडताळणी केली जाते. जुन्या सदस्यांच्या तुलनेत ते अधिक आकर्षक आहेत याची खात्री करून मगच त्यांना या साईटचे सदस्यत्व देण्यात येते.या वेबसाईट चालवणाऱ्या कंपनीने लाॅसएंजेलिस मध्ये क्लब सुरु केला असून त्याठिकाणी प्रवेशासाठी अधिक कडक धाेरण आहे.
क्लबमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या पाहुण्यांना परिक्षकांच्या समाेर जावे लागेल.हे परिक्षक समाेरची व्यक्ती आकर्षक आहे किंवा कसे हे ठरवणार आहे.श्रीमंतांसाठी मात्र प्रवेशासाठीच्या आकर्षक दिसण्याची अट शिथिल करण्यात येणार आहेत. कंपनीचे असे म्हणणे आहे की, आमच्या सदस्यांची अशी तक्रार आहे की, माेठा खर्च करून महागड्या बारमध्ये गेल्यावर आपल्यासारख्याच आकर्षक व्यक्तिमत्वाचे स्त्री-पुरूष त्याठिकाणी भेटतील याची अजिबात खात्री नसते. त्यामुळे आता या क्लबमध्ये मेंबरना प्रवेश देण्याबराेबरच त्याठिकाणी येणाऱ्या गेस्टना मात्र ते पुरेसे आकर्षक आहेत याची खात्री करूनच आता साेडण्यात येते. या कंपनीच्या डेटिंग वेबसाईटवर मात्र श्रीमंत व्यक्ती ार देखण्या आणि सुंदर नसतील तरी त्यांना क्लबमध्ये प्रवेश देण्यात येताे. कारण अनेकांना पैसा ही गाेष्ट दिसण्यापेक्षा जास्त आकर्षक वाटते.