पाेलीस कर्मचाऱ्यांना सदनिकांचे वाटप

    19-Aug-2025
Total Views |
 

Police 
 
जुना बुधवार पेठेतील राज्य पाेलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत राजर्षी शाहू महाराज पाेलीस संकुल या नावाने उभारण्यात आलेल्या पाेलिसांच्या नूतन निवासी इमारतीतील काही सदनिकांच्या प्रतीकात्मक चाव्या संबंधित लाभार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांनी या सदनिकांची पाहणी करून समाधान व्य्नत केले; तसेच या सदनिका दर्जेदार झाल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालक मंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भाेसले, राज्य नियाेजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार सर्वश्री चंद्रदीप नरके, राजेंद्र यड्रावकर, अमल महाडिक, शिवाजी पाटील, पाेलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी, काेल्हापूर परिक्षेत्राचे पाेलीस महानिरीक्षक सुनील फुलारी उपस्थित हाेते. काेल्हापूर जिल्हा पाेलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सर्व साेयींनी यु्नत अशी 168 शासकीय निवासस्थाने बांधण्यासाठी राज्य शासनाने 34 काेटी 62 लाखांचा निधी मंजूर केल्याची माहिती पाेलीस अधीक्षक याेगेशकुमार गुप्ता यांनी दिली.