ओशाे - गीता-दर्शन

    19-Aug-2025
Total Views |
 

Osho 
येशू आल्याने त्या गावच्या पंडित-पुराेहितांची माेठी पंचाईत झालेली असते. असे नेहमीच हाेत असते. तेव्हा कधी एखाद्या ज्ञात्याचे आगमन हाेते तेव्हा ताेतया ज्ञात्यांची पंचाईत हाेत असते. हे स्वाभाविक आहे. यात आश्चर्य काही नाही. पंडितांचे ज्ञान येते पुस्तकातून. येशू जे जाणतात ते येते जीवनातून, ते जिवंत, ज्वलंत असते. पाेपटपंची करणारा त्या जिवंत ज्ञानासमाेर, येशूंसमाेर फिका पडणार हे निश्चितच, त्यांची माेठी अडचण हाेते.गावातले पंडित त्रस्त आहेत, ते विचार की करतात येशूंना फसवण्याचा काहीतरी उपाय केला पाहिजे. त्यांनी बराच खल करून एक उपाययाेजना केली. उपायांची काय कमतरता? गावातल्या एका व्यभिचारी स्त्रीला त्यांनी धरून आणले. यहुद्यांच्या जुन्या धर्मग्रंथात अशा व्यभिचारी स्त्रीला दगडांनी ठेचून मारण्याची तरतूद आहे. तेव्हा तिला घेऊन ते येशूंकडे आले व म्हणाले, ‘हा आपला धर्मग्रंथ, यात असे लिहिले आहे की, व्यभिचारिणीला दगडांनी ठेचून मारले पाहिजे. ही व्यभिचारिणी आहे. आपलं काय म्हणणं आहे? ही स्त्री व्यभिचारिणी आहे हे गावातल्या प्रत्येकाला माहीत आहे.’