सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुप दहीहंडी संघाच्या गाेविंदांनी 7 थर लावून फाेडली. शनिवारी रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी चाैथ्या प्रयत्नांत दहीहंडी फाेडण्यात गाेविंदांना यश आले. विराज कांबळे या गाेविंदाने हंडी फाेडली. बेलबाग चाैकाजवळ असलेल्या दहीहंडी उत्सवाच्या पारंपरिक जागेत जय गणेश प्रांगणात दहीहंडी उत्सवाचे आयाेजन करण्यात आले हाेते.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, साैरभ रायकर, सचिन आखाडे, अमाेल चव्हाण, तुषार रायकर, प्रतीक घाेडके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित हाेते. या दहीहंडी उत्सवासाठी गाेपाळभ्नतांनी माेठी गर्दी केली हाेती. राधेकृष्ण ग्रुपच्या गाेविंदाने हंडी फाेडताच गाेपाळभ्नतांनी जल्लाेष केला. दहीहंडी संघाला 51 हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह देऊन गाैरवण्यात आले.