गणेश सार्वजनिक मंडळांना दीड काेटींची बक्षिसे देण्याचा निर्णय

    18-Aug-2025
Total Views |
 

Ganesh 
 
शंभर वर्षांहून माेठी परंपरा असलेल्या गणेशाेत्सवाला राज्य महाेत्सवाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.राज्यभरातील 480 सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळांना दीड काेटीची बक्षिसे दिली जाणार आहेत; तसेच भजनी मंडळांना पाच काेटींचे अनुदान देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.गणेशाेत्सवाला राज्य महाेत्सवाचा दर्जा देण्याची घाेषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली हाेती. आता सरकार थेट सहभागी हाेऊन हा महाेत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पाेहाेचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्यात गणेशाेत्सवात सरकारच्या माध्यमातून हाेणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा सरकारने जाहीर असून, त्याबाबतचा शासन निर्णय सांस्कृतिक कार्य विभागाने जारी केला आहे.
 
गणेशाेत्सवानिमित्त संस्था आणि विविध समाज घटकांना सामाजिक सलाेख्यासाठी एकत्रित आणणे, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर साजऱ्या हाेणाऱ्या सार्वजनिक गणेशाेत्सवास प्राेत्साहन देणे, विविध सांस्कृतिक विषयांचे जतन-संवर्धनासाठी विविध स्पर्धा, व्याख्यानमाला आदी उपक्रम आयाेजित करण्यात येणार आहेत.गणेशाेत्सवावर आधारित टपाल तिकीट आणि नाणे प्रकाशित करण्यात येणार आहे; तसेच उत्सवादरम्यान प्रमुख ठिकाणी विद्युत राेषणाई व सुशाेभीकरण, विर्सजन साेहळ्यात आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी विविध साेयीसुविधा व वाहनव्यवस्था तसेच राज्यात शिकत असणाऱ्या देशाबाहेरील विद्यार्थ्यांना या महाेत्सवात सहभागी हाेण्यासाठी उपक्रम राबवणार येणार आहेत