विजयदुर्गचा दिशादर्शक बुरूज ढासळला

    18-Aug-2025
Total Views |
 

Durg 
विजयदुर्ग किल्ल्याच्या दिशादर्शक बत्तीजवळ असणाऱ्या व्यंकट बुरजाची समुद्रातील लाटांच्या माराने खालची बाजू ढासळली. त्यामुळे किल्ल्याची तटबंदी ढासळण्याची मालिका चालूच असल्याचे दिसून येत आहे. पाऊस आणि लाटांचा मारा तीव्र असल्याने पावसाळ्यात विजयदुर्ग किल्ल्याची पडझड हाेते.पावसाळ्यात समुद्राला उधाण येत असल्याने लाटांचा वेग वाढताे.अशातच रात्री किल्ल्यातील दिशादर्शक बत्तीजवळच्या व्यंकट बुरजाची समुद्राकडील खालची बाजू ढासळली.किल्ल्याची बांधणी करताना तसेच त्याची व्याप्ती वाढवताना त्यावेळेस सागर तटबंद आणि खडकांच्या नैसर्गिक रचनेचा विचारपूर्वक वापर करण्यात आला हाेता.
 
विजयदुर्ग किल्ला खडकाळ द्वीपकल्पावर बांधलेला आहे. त्यामुळे तीन बाजूने खाेल पाण्याचा व नैसर्गिक खडकांचे संरक्षण मिळते.
तत्कालीन परिस्थितीत समुद्राच्या लाटा सरळ तटबंदीवर आदळून किल्ल्याचे नुकसान हाेऊ नये म्हणून तिरक्या उताराची खडकांची मांडणी केली हाेती. जेणेकरून लाटांची ऊर्जा कमी हाेऊन ती परत समुद्रात वळवली जाते.काँक्रीटच्या माध्यमातून हा ट्रायपाॅड उभारणे आता गरजेचे झाले आहे.दरम्यान, आता युनेस्काेच्या ताब्यात हा किल्ला गेल्यामुळे विजयदुर्ग किल्ल्याचा कायापालट हाेणार आणि किल्ल्याची काेसळलेली तटबंदी पुन्हा भक्कमपणे उभी राहण्याचा विश्वास विजयदुर्गवासीय व्य्नत करत आहेत.