जनतेच्या विविध प्रश्नांवर प्रदेश काँग्रेसच्या आंदाेलनात वाढ

    18-Aug-2025
Total Views |
 

congree
देश व राज्यातील विविध प्रश्नांवर काँग्रेस पक्ष सातत्याने जनजागृती, आंदाेलन, मेळावे करताना दिसत आहे. अनेक प्रश्नांवर काँग्रसने सक्रिय भूमिका घेतली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश काँग्रेसमध्ये पुन्हा नवचैतन्य सळसळताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये काँग्रेसने विविध मुद्द्यांना वाचा फाेडली. जनतेला न्याय मिळण्यासाठी काँग्रेस सातत्याने रस्त्यावर उतरल्याचे दिसत आहे.मतचाेरीविराेधात आंदाेलन निवडणुकीत मतचाेरी हाेत असल्याचा आराेप करत, त्याच्या विराेधात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदाेलन करण्यात आले. दादरमध्ये चक्काजाम करण्यात आला. यावेळी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत निवडणूक आयाेग व भाजप सरकारविराेधात जाेरदार घाेषणाबाजी केली.
यावेळी सपकाळ म्हणाले, ‘लाेकसभेतील विराेधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयाेगाने कशाप्रकारे मतचाेरी केली, त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला कसा झाला, हे नुकतेच पत्रकार परिषदेत मांडले.निवडणुकीत घाेटाळा झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे सरकारने राजधर्म पाळत एसआयटी स्थापन करायला हवी हाेती. किंवा सर्वाेच्च न्यायलयाच्या न्यायमूर्तींकडून या संपूर्ण प्रकरणाची चाैकशी व्हायला पाहिजे हाेती; पण राहुल गांधीयांनी पुरावे देत तथ्य मांडूनही केंद्र सरकार चाैकशी करण्याची धमक दाखवत नाही. निवडणूक आयाेग खुलासा करत नाही. उलट राहुल गांधी यांनाच प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले, हा प्रकार हास्यास्पद आहे.’ या वेळी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष माेहन जाेशी, राजन भाेसले, अतुल लाेंढे, अनंत गाडगीळ आदी उपस्थित हाेते.
राष्ट्रीयीकृत बँका वाचविण्यासाठी सभा राष्ट्रीयीकृत बँकांवर खासगीकरणाचे संकंट येत आहे. त्यामुळे या विषयी जनजागृती करण्यासाठी प्रदेश काँग्रेसतर्फे सभा घेण्यात आली.यावेळी हर्षवर्धन सपकाळ, माजी खासदार कुमार केतकर, हुसेन दलवाई, बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ विश्वास उटगी आदी उपस्थित हाेते.यावेळी सपकाळ म्हणाले, ‘इंदिरा गांधी यांनी 1969 साली बँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामागे एक महत्त्वाचे कारण हाेते.देश व राज्यातील विविध प्रश्नांवर काँग्रेस पक्ष सातत्याने जनजागृती, आंदाेलन, मेळावे करताना दिसत आहे. अनेक प्रश्नांवर काँग्रसने सक्रिय भूमिका घेतली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश काँग्रेसमध्ये पुन्हा नवचैतन्य सळसळताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये काँग्रेसने विविध मुद्द्यांना वाचा फाेडली. जनतेला न्याय मिळण्यासाठी काँग्रेस सातत्याने रस्त्यावर उतरल्याचे दिसत आहे.
मतचाेरीविराेधात आंदाेलन निवडणुकीत मतचाेरी हाेत असल्याचा आराेप करत, त्याच्या विराेधात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदाेलन करण्यात आले. दादरमध्ये चक्काजाम करण्यात आला. यावेळी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत निवडणूक आयाेग व भाजप सरकारविराेधात जाेरदार घाेषणाबाजी केली.यावेळी सपकाळ म्हणाले, ‘लाेकसभेतील विराेधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयाेगाने कशाप्रकारे मतचाेरी केली, त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला कसा झाला, हे नुकतेच पत्रकार परिषदेत मांडले.निवडणुकीत घाेटाळा झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे सरकारने राजधर्म पाळत एसआयटी स्थापन करायला हवी हाेती. किंवा सर्वाेच्च न्यायलयाच्या न्यायमूर्तींकडून या संपूर्ण प्रकरणाची चाैकशी व्हायला पाहिजे हाेती; पण राहुल गांधी त्यावेळी देशातील आर्थिक स्राेतांचा ताबा मुठभर लाेकांच्या हातात हाेता व ही शक्ती लाेकशाहीवरही ताबा मिळवू पाहत हाेती.
त्यामुळे त्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन देशाला प्रगतिपथावर नेले.आता पुन्हा 56 वर्षांनी देशात एक नवी ईस्ट इंडिया कंपनी आली असून, दाेन भाईंचा मस्तवाल कारभार देशातील सर्व संस्था आपल्या हाती घेऊ पाहात आहे. या अदानी व अंबानी यांच्याच कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याची गरज आहे.’ राेहित पैठणकर यांची हाॅस्पिटलमध्ये घेतली भेट बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील राेहित पैठणकर नावाच्या युवकाला जातधर्म विचारून अमानुष मारहाण करण्यात आली हाेती. पैठणकर यांना अकाेला येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते.हर्षवर्धन सपकाळ यांनी पैठणकर यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सपकाळ म्हणाले, ‘पैठणकर यांना हल्लेखाेरांनी जातधर्म विचारून अमानुष मारहाण केली. त्याला गायचाेर म्हणत नग्न करण्याचा प्रयत्नदेखील करण्यात आला.
हा संपूर्ण प्रकार व्हिडिओच्या माध्यमातून साेशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची गंभीर अवस्था समाेर आली आहे.’ नवनियु्नत पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण प्रदेश काँग्रेसच्या नवनियु्नत जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांचे दाेन दिवसीय निवासी शिबिर नुकतेच आयाेजित करण्यात आले हाेते. मुंबईतील टिळक भवन येथे हे शिबिर झाले. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी शिबिराचे उद्घाटन केले. प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्हिडिओ काॅन्फरसच्या माध्यमातून संवाद साधला.आमदार अमित देशमुख, विश्वास उटगी, शाहीर संभाजी भगत आदींनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.सायंकाळी सर्वधर्मीय सामूहिक प्रार्थना झाली.शिबिराच्या दुसऱ्या दिवशी श्रमदान करण्यात आले.सांगली जिल्ह्यातील राष्ट्र सेवा दलाच्या पथकाने देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले.
ओबीसींच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न ओबीसींच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस प्रयत्नशील असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. काँग्रेस ओबीसी सेलने आयाेजिलेल्या बैठकीत ते बाेलत हाेते. ओबीसी जनगणनेची भूमिका, वडार समाजाचे सामाजिक-राजकीय प्रश्न आदी विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय आणि महाराष्ट्राच्या राजकारणात वडार समाजासह ओबीसी समाजाची भूमिका, ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी काँग्रेस पक्षाचे धाेरण आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली.ओबीसी सेल अध्यक्ष भानुदास माळी, अतुल लाेंढे आदी उपस्थित हाेते.बाबाजानी दुर्रानींचा पक्षप्रवेश परभणी जिल्ह्यातील तीन वेळचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार अमित देशमुख आदी उपस्थित हाेते.दुर्राणी यांच्यासह परभणीतील माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, जिल्हा बँकेचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, संचालक आदींनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.