जगणे साेपे हाेण्यासाठी काय करावे?

    16-Aug-2025
Total Views |
 

thoughts 
 
1) व्हाॅटस् अ‍ॅपवरील दीर्घकाळच्या टाईप करून चालणाऱ्या संभाषणापेक्षा दूरध्वनीवर प्रत्यक्ष बाेला. त्यामुळे तुमचे संभाषण वाढेल आणि कधीकधी तुम्हांला अधिक स्पष्टता येण्यास मदत हाेईल. एखाद्यावेळी तुम्ही याेग्य प्रकारे स्पष्टीकरण देऊ शकाल.कधीतरी दाेघांमध्ये गैरसमज न हाेण्यास मदत हाेईल किंवा असलेले गैरसमज दूर हाेतील.
 
2) वर्तमानात जगायला शिका आणि सुंदर भविष्याबाबत आशावादी रहा. तुमच्या गतकाळातील इतिहासापासून लांब रहा.आयुष्यातील उरलेल्या कालावधीवर लक्ष केंद्रित करा. आयुष्य खूप छाेटे असते.मिळालेले आयुष्य चांगल्या प्रकारे जगा.
 
3) अरजितसिंगच्या गाण्यापासून लांब रहा.तुम्ही कधीही न भेटलेल्या व्यक्तींच्या आठवणी त्यामुळे मनात तयार हाेतात.
तुम्ही दुःखी हाेता. त्याचे कारण तुम्हांलाच कळत नाही.
 
4) कामाच्या वेळा आणि झाेपेचे चक्र याबाबतची शिस्त काटेकाेरपणे पाळा.
 
5) नियमितपणे दैनंदिनी लिहिण्याची सवय ठेवा. तुम्ही किती वेळ वाया घालवला आणि किती वेळ चांगल्या कामात गुंतवला याची नाेंद ठेवा. त्यातून दुसऱ्या दिवसाचे नियाेजन करण्यास मदत हाेईल.
 
6) राेज किमान पाच मिनिटे ध्यानधारणा करा. त्यामुळे तुमची विचार प्रक्रिया स्वच्छ हाेण्यास मदत हाेईल.
 
7) कधीही सकाळचा नाश्ता टाळू नका.घरातून बाहेर पडताना पाेटभर नाश्ता करून बाहेर पडा.
 
8) काही वेळा माफ करण्यातूनच आयुष्यात शांतता लाभते.
 
9) काही वेळा फक्त तुमची प्रतिक्रिया पाहण्यासाठी समाेरच्या व्यक्तीने कृती केलेली असते. त्यामुळे कधीही घाईघाईत प्रतिक्रिया देऊ नका.
 
10) चहाचे व्यसन हाेऊ देऊ नका.