मुलांना अपघातांपासून जपा

    15-Aug-2025
Total Views |
 

thoughts 
 मुलांना रहदारीच्या रस्त्यावर खेळू देऊ नका. बऱ्याचदा मुले मुख्य रस्त्याच्या आजुबाजूला खेळतात व अपघातांना आमंत्रण देतात.
 आपण मुलांसाेबत रस्त्याने जात असताना मुलांना डावीकडून चालण्यास सांगा व स्वत:ही चाैफेर पाहात रस्ता ओलांडा.
 पावसाळ्यात उंच गवतात वा ओसा जमिनीवर मुलांना जाऊ देऊ नका. अशा ठिकाणी साप, विंचवासारखे विषारी कीटक त्यांना चावू शकतात.
 बाहेर अनवाणी जाऊ देऊ नका.अनवाणी पायांना काटे, खिळे, टाेकदार वस्तू टाेचली जाण्याची श्नयता असते.
 आपण अनेकदा गमतीने एखादा बसत असताना मागील खूर्ची हटवताे.आपले पाहून असे मुलेही करू लागतात व अपघाताचे शिकार हाेतात.
 आजकाल स्वयंचलित बंद दारे असतात. लहान मुले घरात असल्यास त्यांची बाेटे इ. दारात सापडू शकतात वा ते पडू शकतात. यासाठी दारांना डाेअर ्नलाेजर लावावे.
 दार वाऱ्याने अचानक बंद झाल्यास मुलांना मार लागू शकताे वा ती आत अडकू शकतात.
 कीटकनाशकांचे डबे, खताच्या पिशव्या इ. मुलांचा हात पाेहचणार नाही अशा ठिकाणी ठेवावेत.
 कात्री, ब्लेड, चाकू इ. मुलांच्या हाती लागणार नाही अशा प्रकारे ठेवावेत.वापरानंतर या वस्तू जागेवर ठेवाव्यात.
 किचनमध्ये मुलांना पदार्थांची गरम भांडी, उकळते तेल, कढई इ.पासून दूर ठेवावे. माचिस, लायटर व चटकन आग पकडणाऱ्या वस्तू नेहमी मुलांपासून दूर ठेवाव्यात.
 औषधे नेहमी मुलांचा हात पाेहाेचणार नाहीत अशा ठिकाणी ठेवावीत.मुलांना औषध गाेड आहे अशी लालूच दाखवून पाजू नये अन्यथा ते त्यांच्या हाती लागल्यास जास्त प्रमाणात पिऊ शकतात.ज्याचे भयंकर परिणाम हाेऊ शकतात.