राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत शिधापत्रिकारकांना अन्नधान्य व साखरेचे वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या कमिशनमध्ये ्निंवटल मागे 20 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आता दुकानदारांना क्विंटलमागे वीस रुपयांची वाढ मिळाल्याने यापूर्वीच्या 150 रुपयांऐवजी 170 रुपये मार्जिन मिळणार आहे. अंत्याेदय अन्न याेजना व प्राधान्य कुटुंब याेजना शिधापत्रिकाधारकांना 53910 रास्तभाव दुकानदारांमार्फत ई-पाॅस मशिनद्वारे बायाेमेट्रिक पडताळणी करून अन्नधान्य, साखर व इतर वस्तूंचे वितरण करण्यात येते. या दुकानदारांना केंद्राकडून 45 रुपये आणि राज्य शासनाकडून 105 रुपये, असे एकूण ्निंवटलमागे 150 रुपये कमीशन म्हणून दिले जात हाेते. या मार्जिन रकमेत वाढ करण्याची विनंती या दुकानदारांच्या संघटनांकडून करण्यात येत हाेती. त्यानुसार या कमिशनमध्ये क्विंटलमागे 20 रुपयांची वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार ्निंवटलमागे रास्त भाव दुकानदारांना 170 रुपये (1700 रुपये प्रति टन) असे कमीशन देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे दरवर्षी सुमारे 92 काेटी 71 लाखांची अतिरिक्त तरतूद केली जाणार आहे.