सर्वांत अरुंद गगनचुंबी इमारतीचे पेंटहाऊस 941 काेटींमध्ये उपलब्ध

    15-Aug-2025
Total Views |
 

pent 
 
मॅनहटनमध्ये जगातील सर्वांत अरुंद गगनचुंबी इमारत स्टाइनवे टाॅवर ही आहे.तिच्या छतावर असलेले शानदार पेंटहाऊस 941 काेटी रुपयांमध्ये उपलब्ध आहे.हे चार मजली घर 1,428 फूट उंच गगनचुंबी इमारतीच्या 80 ते 83 मजल्यांमध्ये पसरले आहे. इथून सेंट्रल पार्क आणि संपूर्ण न्यूयाॅर्कचे अनाेखे दृश्य पाहता येते.तथापि ही या प्रदेशातील सर्वात महाग प्राॅपर्टी नाहीये.याच्या आधी सन 2019मध्ये बिलियनर्स राे वर 220 सेंट्रल पार्क साऊथ मध्यएक ्नवाडप्ले्नस 2,033 काेटी रुपयांत विकण्यात आले हाेते.शानदार डिझाइन स्टुडियाे साेफिल्ड द्वारे डिझाइन करण्यात आलेल्या या पेंटहाऊसच्या इंटिरियरमध्ये संगमरवर, चुन्याचे दगड, काळे स्टील आणि मखमल यांचा वापर केला आहे. अशा सामग्रीमुळे भव्यतेचा अनुभव येताे. फ्लाेर प्लॅनमध्ये एक एंटरटेनिंग सूट, एक प्रायमरी सूट आणि क्राउन सूट आहे. 82 फुटांचा स्विमिंग पूल, प्रायव्हेट किचन आणि एक लँडस्केप टेरेस सुद्धा उपलब्ध आहे.