पारंपरिक खेळाडूंना शासकीय नाेकरीसाठी प्रयत्न करू : काेकाटे

    15-Aug-2025
Total Views |
 
 

kokate 
 
पारंपरिक देशी खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार, शासकीय लाभ आणि नियु्नत्यांबाबत शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री अ‍ॅड. माणिकराव काेकाटे यांनी कुर्ला येथे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभाचे उद्घाटन करताना दिले. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या नावाने दरवर्षी पारंपरिक खेळांच्या स्पर्धा शासकीय पातळीवर झाल्या पाहिजेत, असे मत काैशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लाेढा यांनी व्यक्त केले.अ‍ॅड. काेकाटे आणि लाेढा यांच्या उपस्थितीत या क्रीडा महाकुंभाचे उद्घाटन आणि पुण्यश्लाेक अहिल्यादेवी हाेळकर देशी खेळांच्या मैदानाचे लाेकार्पण करण्यात आले.
 
यावेळी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी साैरभ कटियार, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, क्रीडा भारतीचे काेषाध्यक्ष गणेश देवरुखकर, मुंबई अध्यक्ष मिलिंद डांगेआणि खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव उपस्थित हाेते.मराठमाेळे ढाेल आणि लेझीमच्या तालावर उत्साहपूर्ण वातावरणात महाकुंभास सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेशही ऐकवण्यात आला. यावेळी लाठीकाठी, मल्लखांब आणि तलवारबाजी या साहसी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.