साैर ऊर्जा याेजनांची अंमलबजावणी महाराष्ट्रात आदर्शवत

    15-Aug-2025
Total Views |

 Solar
मुंबई, 14 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्रात महावितरणने साैर ऊर्जेच्या विविध याेजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे वीजदर कपातीसह शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा, घरगुती ग्राहकांना साैर दिवसा वीज दरात सवलत, तसेच क्राॅस सबसिडीचा बाेजा कमी हाेऊन औद्याेगिक व व्यावसायिक वीज दरात घट हाेण्यास सुरवात झाली आहे. साैर याेजनांची ही अंमलबजावणी व फलनिष्पत्ती इतर राज्यांसाठी आदर्श आहे, असे गाैरवाेद्गार केरळचे अपर मुख्य सचिव (ऊर्जा) पुनीत कुमार यांनी येथे काढले.महाराष्ट्रातील विविध साैर ऊर्जा याेजनांची अंमलबजावणी व माहिती घेण्यासाठी पुनीत कुमार यांनी महावितरणच्या ‘प्रकाशगड’ मुख्यालयास भेट दिली.
 
यावेळी आयाेजित बैठकीत अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लाेकेश चंद्र यांनी विविध साैर याेजनांमुळे 2030 पर्यंत राज्याच्या वीजक्षेत्रात हाेणारे आमुलाग्र बदल, ग्राहकाभिमुख फायदे, वीज दर कपात, आर्थिक गुंतवणूक व राेजगार संधी आदींची माहिती दिली.यावेळी संचालक सचिन तालेवार (संचालन/ प्रकल्प), याेगेश गडकरी (वाणिज्य), राजेंद्र पवार (मानव संसाधन) उपस्थित हाेते.राज्याच्या वीज क्षेत्रासाठी रिसाेर्स अ‍ॅडेक्वेसी प्लॅन तयार करण्यात आला आहे. त्यानुसार 2030 पर्यंत 38 हजार मेगावाॅट हरित ऊर्जेसह 45 हजार मेगावाॅट विजेची आणखी भर पडणार आहे. राज्यातील नवीकरणीय ऊर्जे ची क्षमता 13 ट्न्नयांवरून 52 टक्के हाेणार आहे. यात सुमारे 3 लाख 30 हजार काेटींची गुंतवणूक हाेणार असून, सुमारे 7 लाख राेजगार निर्माण हाेणार आहेत.तसेच, पुढील पाच वर्षांत वीज खरेदीमध्ये 82 हजार काेटींची बचत हाेईल. त्यायाेगे सर्व वर्गवारीचे वीज दर कमी हाेत जाणार आहेत, असे आभा शुक्ला यांनी सांगितले.
 
देशात सर्वाधिक 45 लाख कृषिपंप महाराष्ट्रात आहेत. राेज 30 टक्के म्हणजे 16 हजार मेगावाॅट विजेचा कृषिपंपांना पुरवठा केला जाताे. दिवसा व शाश्वत वीजपुरवठ्यासाठी आतापर्यंत पीएम कुसुम-सी याेजना व मागेल त्याला साैर कृषिपंप याेजनेतून देशात सर्वाधिक 5 लाख 12 हजार साैर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री साैर कृषिवाहिनी याेजना 2.0 मधून जगातील सर्वांत माेठा 16 हजार मेगावाॅटचा विकेंद्रित साैर ऊर्जा निर्मिती प्रकल्प पूर्णत्वास जात आहे. यासह पीएम सूर्यघर याेजनेतून अडीचलाख घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्यवत झाले आहे, असे लाेकेश चंद्र यांनी सांगितले.पुनीत कुमार यांनी साैर याेजनांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. केरळमध्ये नद्या व पर्वतांमुळे प्रामुख्याने जलविद्युत निर्मितीवर भर देण्यात आला आहे. मात्र, आता साैर ऊर्जेवर लक्ष केंद्रित केले आहे.महाराष्ट्राने साैर ऊर्जेत कमी कालावधीत केलेली माेठी प्रगती व त्यास मिळालेले यश अनुकरणीय आहे, असे त्यांनी सांगितले.