देखें प्राप्तार्थ जाहले। जे निष्कामता पावले। तयांही कर्तव्य असे उरलें । लाेकांलागीं Ÿ।। (3.155)

    13-Aug-2025
Total Views |
 

saint 
 
आपणांस अनुकूल असे कर्म केल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती झाली तरी लाेकांना मार्गदर्शन व्हावे म्हणून ज्ञानी माणसाने कर्मे करावयाची असतात. परमात्म्याच्या ठिकाणी रममाण झाले तरी काेणत्याही कर्माचा वा देहधर्माचा लाेप हाेत नाही.वरवर पाहता असे वाटते की, एकदा तृप्ती झाल्यानंतर स्वयंपाकाच्या साधनांची आपण आवराआवर करताे.त्याप्रमाणे आत्मज्ञान झाले की, कर्तव्यकर्म करण्याची जरूरी राहात नाही, पण श्रीकृष्ण म्हणतात की, हे तितकेसे बराेबर नाही. विषयांचे संबंध साेडून देऊन प्रत्येकाने स्वभावजन्य कर्म करावयास पाहिजे.असे कर्म करूनच लाेक माेक्षाला गेले आहेत. अर्जुना, जनकादिक महात्मे कर्मे करताच माेक्षसुखाला प्राप्त झाले. म्हणून कर्मे करण्यासाठी माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती असावी.
 
ज्ञानी पुरुषाने कर्मे करण्याचे आणखीएक कारण असे. त्याच्या आचरणाकडे पाहून इतर लाेकांनाही वागण्याचे मार्गदर्शन हाेते. लाेक या ज्ञानी पुरुषाप्रमाणे वागू लागतात व त्यांचा अध:पात चुकताे. जन्ममृत्यूंच्या ेऱ्यात ते सापडत नाहीत.म्हणून अर्जुना, ज्यांना परमात्म्याची प्राप्ती झाली आहे आणि विषयसुखांची वासना उरलेली नाही, त्यांनीही कर्तव्यकर्म इतरांना मार्गदर्शन हाेण्यासाठी करण्याची जरूरी असते.एखादा डाेळस मनुष्य जसा आंधळ्याला मार्ग दाखविताे, त्याप्रमाणे शहाण्या माणसाने आपल्या स्वत:च्या आचाराने अज्ञानी लाेकांना धर्मरूप मार्ग दाखवावा लागताे. नाहीतर या अज्ञानी लाेकानां परमात्म्याच्या प्राप्तीचा मार्ग कसा दिसणार? गीतेचे वचन आहे, या जगात श्रेष्ठ लाेक जसे आचरण करतात ते आचरण म्हणजेच धर्म हाेय. सामान्य लाेक नंतर त्यानुसार वागतात. म्हणून ज्ञानी माणसाने कर्म न साेडता इतर लाेकांसाठी आपले कर्तव्यकर्म करीत राहावे.