म्हणून लक्ष्मण देवाचा माणूस!

    13-Aug-2025
Total Views |
 
 

cricket 
 
व्हीव्हीएस लक्ष्मण हा बॅट्समन म्हणून थाेर हाेताच, पण ताे माणूस म्हणूनही ग्रेट आहे, असं त्याचा संघ सहकारी इरफान पठाण सांगताे. एका ऑस्ट्रेलिया दाैऱ्यात इरफान अगदीच नवाेदित हाेता. तेव्हा सगळ्या खेळाडूंना एकसारखं खानपान दिलं जायचं. ब्रेकफास्ट, लंच, डिनर यांचे तिकडचे पदार्थ बडाेद्यासारख्या लहान शहरातून आलेल्या इरफानला आवडायचे नाहीत. त्याने काही मांसाहारी पदार्थ चाखून पाहिले हाेते, पण तिकडची फिक्या चवीची, बिनमसाल्याची काेंबडीही त्याला आवडली नाही आणि इतरही काही फारसं पटलं नाही.
 
शेवटी ताे बिचारा दूध भातावर आला. दूध भात आणि अगदीच काही इतर खावंसं वाटलं तर ते, याच्यावर त्याचा कारभार चालू हाेता. हे लक्ष्मणने पाहिलं आणि दुपारी इरफानला फाेन केला. म्हणाला, ‘चल बाहेर जेवायला जाऊ. मला खाली भेट लाॅबीमध्ये.’ त्याने ते कुठे जाणार आहेत, ते सांगितलं नाही. ते राहात हाेते त्या हयात हाॅटेलच्या समाेर एक छाेटं थाय रेस्टाॅरंट हाेतं. तिथे त्याने इरफानला नेलं. तिथलं जेवणही इरफानसाठी नवं हाेतं. पण, मसालेदार असल्याने आवडलं. लक्ष्मण त्याला म्हणाला, ‘तुला खूप प्रवास करावा लागणार आहे. ताे सुखाचव्हायचा असेल तर सगळीकडचं खाणं खायला शीक. नाहीतर तुला मैदानावर आवश्यक ताकद मिळणार कशी?