राेजगारात स्थानिक युवकांना प्राधान्य द्या: मुख्यमंत्री

    13-Aug-2025
Total Views |
 

CM
लातूर जिल्ह्यात राेजगाराच्या संधी वाढवण्यासाठी रेल्वे बाेगी कारखान्याची उभारणी करण्यात आली आहे.या कारखान्यात लवकरच वंदे भारत रेल्वेच्या बाेगींचे उत्पादन सुरू हाेणार असून, यामुळे सुमारे दहा हजार राेजगार निर्माण हाेतील. यात स्थानिक युवक-युवतींना प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या जिल्ह्यातील विकासकामांच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बाेलत हाेते. यावेळी पालक मंत्री शिवेंद्रसिंहराजे भाेसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गाेरे, आमदार सर्वश्री विक्रम काळे, संभाजी पाटील-निलंगेकर, संजय बनसाेडे, अभिमन्यू पवार, रमेश कराड, विशेष पाेलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, पाेलीस अधीक्षक अमाेल तांबे आणि लातूर महापालिकेच्या आयु्नत मानसी आदी उपस्थित हाेते.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगराेत्थान महाअभियानांतर्गत लातूर शहर वाढीव पाणीपुरवठा याेजना, जिल्हा रुग्णालयआदींचा आढावा घेण्यात आला.रेल्वे बाेगी कारखान्यासाठी स्थानिक स्तरावर कुशल मनुष्यबळ उपलब्ध हाेण्यासाठी जिल्ह्यातील आयटीआय आणि पाॅलिटेक्निकमध्ये आवश्यक ट्रेड्स सुरू करावेत.यासाठी राज्य शासन सर्वताेपरी सहकार्य करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.उदगीर येथील शासकीय दूध भुकटी प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. मदर डेअरीच्या सहकार्याने हा प्रकल्प पुन्हाकार्यान्वित करण्याचा प्रस्ताव सादर करावा. त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी नमूदकेले.शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह जिल्ह्यातील लाेकप्रतिनिधींनी जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक विकासकामांची माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात सुरू असलेली विकासकामे तसेच प्रस्तावित कामांविषयी माहिती सादर केली.