वर्साेव्यात निःक्षारीकरण प्रकल्पासाठी मागवले अर्ज

    01-Aug-2025
Total Views |
 
 
 

varsova 
समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गाेडे पाणी मिळवण्यासाठी आता अंधेरीच्या वर्साेवा समुद्र किनाऱ्यावरही नि:क्षारीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने स्वारस्य अर्ज मागवले आहेत. वर्साेव्यात 200 दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प उभा राहणार आहे. वाढत्या लाेकसंख्येची पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेने पश्चिम उपनगरातील मनाेरीत निःक्षारीकरण प्रकल्प उभारण्याची घाेषणा 2021 मध्ये केली हाेती. मात्र, अद्याप हा प्रकल्प सुरू झालेला नाही. त्यातच आता पालिकेने पश्चिम उपनगरातीलच अंधेरी पश्चिमेकडील वर्साेवा समुद्र किनाऱ्यावर असाच प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे. 200 दशलक्ष लिटर क्षमतेच्या प्रकल्पासाठी पालिकेने स्वारस्य पत्र मागवले आहेत. मुंबईतील लाेकसंख्या झपाट्याने वाढत असून, त्या तुलनेत पाणी पुरवठ्यासाठीच्या जलाशयांत वाढ झालेली नाही. मुंबईची सर्व भिस्त पावसाच्या पाण्यावर असून, पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांतील पाणीसाठ्यावरच मुंबईकरांना अवलंबून राहावे लागते. पावसाव्यतिरिक्तच्या पर्यायी जलस्राेताची भविष्यात गरज भासणार आहे. त्यासाठी पालिकेने निःक्षारीकरण प्रकल्पाची घाेषणा केली आहे.