खडकी, 31 जुलै : (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
टी.जे. महाविद्यालयातील 1998च्या बॅचचे माजी विद्यार्थी एकत्र येऊन दरमहा फंड जमा करीत आले आहेत. सदर फंडात साठलेल्या रकमेतून त्यांनी शुक्रवार 25 जुलै रोजी भोईर जिल्हा परिषद शाळा, कान्हे फाटा, मावळ या शाळेला स्मार्ट टीव्ही व सुपे गाव जिल्हा परिषद शाळा सातकरवाडीतील शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स साहित्याचे वाटप केले. याप्रसंगी व्होकेशनल बॅचचे दीपंकर गायकवाड, रूपेश पतंगे, प्रवीण वायदंडे, योगिनी वाडेकर, रूपाली निमकर, वृषाली कुंभार, निवेदिता भोसले आणि शाळेतील शिक्षकवर्ग उपस्थित होता. यावेळी आर्मी रिटायर्ड मा. राजीव गबाजी मोहन यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.