आपल्या आहारात दूध सामील करा

    01-Aug-2025
Total Views |
 

milk 
 
काेणत्याही वयात : उतारवयात दूध पिणे तेवढेच आवश्यक असते जेवढे मुलांसाठी आवश्यक असते. दूधात खूप सारे पाैष्टिक घटक असल्यामुळे हे पूर्ण आराेग्यपेय रुपात लाेकप्रिय आहे. शरीरात आवश्यक कॅल्शियमची उणीव भरून काढण्यासाठी राेज एक ग्लास दूध पुरेसे असते.दूध खूप साऱ्या सूक्ष्म पाेषक तत्त्वांचा स्राेत असते जे आपल्या शरीराच्या संपूर्ण विकासासाठी महत्त्वाचे असते.
 
हृदयासाठी फायदेशीर : कॅल्शियम विशेषत: हाडांसाठी फायदेशीर असते, पण हे हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांची श्नयताही कमी करू शकते. यात असलेले मॅग्नेशियम व पाेटॅशियम रक्तदाब कमी करण्यासाेबत शरीरात रक्तप्रवाह वाढवण्यातही मदत करते. हे घटक हृदय व रक्तवाहिन्यांतील तणावही दूर करून ते सुदृढ ठेवण्यात मदत करतात. दूघातील पैप्टाइड्सही एसीईची निर्मिती राेखते. जे रक्तदाब वाढण्याचे मुख्य कारण असते.
 
तणाव नाहीसा हाेताे : व्हिटॅमिन डी मूत्र, भूक व झाेपेसंबंधित एक हार्माेन सेराेटाेनिनचे उत्पादन वाढवण्यास मदत करते. व्हिटॅमिन डीअभावी नैराश्य, थकवा व पीएसमएसशी संबंधित समस्या हाेतात. यामुळे दूध आपल्यासाठी फायदेशीर असते. व्हिटॅमिन डी आपण दूध व त्यापासून बनवलेल्या पदार्थांमधून मिळवू शकताे.
 
दातांसाठी दूध पिणे चांगले : प्रत्येकाने नियमितपणे दूध प्यायला हवे. हे दातांचे आराेग्य टिकवण्यास मदत करते. दूध इनेमलच्या आवरणाचे रक्षण करते. हे ऊर्जा व आराेग्यासाठी प्याल्यामुळे मुलांधील हानिकारक थंड पेय पिण्याची सवय कमी हाेऊ शकते. तसेच दात व हिरड्यांचा त्रास कमी करता येऊ शकताे.
 
त्वचेच्या समस्या दूर करते : पूर्वीपासून त्वचा गाेरी राखण्यासाठी दूधाचा वापर केला जात आला आहे. यामुळेच दूधाचा वापर अनेक काॅस्मेटिक उत्पादने तयार करण्यासाठी केला जाताे. हे रुक्ष त्वचेच्या उपचारासाठीही फायदेशीर असते. जर आपली त्वचा सुकली असेल तर चेहऱ्यावर व इतर प्रभावित भागावर दूधाचा वापर करा व 15 मिनिटांनंतर धुवा. दूधातील लॅ्निटक अ‍ॅसिड मृतत्वचापेशी हटवण्यास मदत करते.दुधातील व्हिटॅमिन ए आपल्या त्वचेच्या संपूर्ण आराेग्यासाठी जाणले जाते. दुधाचे अँटीऑ्नसीडेंट घटक हानिकारक जंतू नष्ट करण्यात मदत करतात. अशाप्रकारे दूध वापरून त्वचा सुंदर बनवू शकता.
 
केस हाेतील सुंदर : आपले केस सुंदर व चमकदार बनवण्यासाठी आपण दूध वापरू शकता. हे आपल्या केसांसाठी फायदेशीर असते. एक चमचा मध व एक चमचा दुधात पिकलेले केळ मिसळा. या मिश्रणात राेझमेरी तेलाचे काही थेंब मिसळा व हे मिश्रण आपल्या केसांना लावा.15-20 मिनिटांनंतर हर्बल शांपूने धुवा. रुक्ष व सुस्त केस पुन्हा जिवंत करण्यासाठी हे खूपच फायदेशीर ठरते.
 
दुधासाेबत धान्यसेवन : दलिया, लापशी, तांदळाची खिचडी, जवाच्या पिठात खाेबरे इ. स्वादिष्ट मिश्रणासाेबत आपण दूधाचा वापर करू शकता. जे आपले जेवण अधिक पाैष्टिक हाेण्यास मदत करते. आपण दुधात आले, लवंग, वेलची, केशर, दालचिनी, जायफळ इ. चितमूटभर मिसळून पिऊ शकता. यामुळे पचनक्रिया उत्तम हाेते.
 
दुधात आढळणारे पाैष्टिक घटक : दुधात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी12 आणि व्हिटॅमिन डी उत्तम प्रमाणात असते. यासाेबत कॅल्शियम, कार्बाेहायड्रेट, फाॅस्फाेरस, सेलेनियम, मॅग्नेशियम, प्राेटीन, झिंक आणि रायबाेफ्लेविनही असते. दुधात पाैष्टिक घटक एवढे असतात की दूध आपल्या हाडांची ताकद वाढवण्यात, आपली त्वचा सुदृढ ठेवण्यास व आपली प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करते.