शिवाजीनगर येथील चंद्रकांत दरोडे विद्यालयात इंटरॅक्ट क्लब इंस्टॉलेशन कार्यक्रम उत्साहात साजरा

    01-Aug-2025
Total Views |
 
sh
 
पुणे 31 जुलै : (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
शिवाजीनगर येथील चंद्रकांत दरोडे प्राथमिक विद्यालयात रोटरी क्लब ऑफ कोथरूड, पुणे यांच्यातर्फे दि. 30 जुलै 25 रोजी इंटरॅक्ट क्लब इंस्टॉलेशन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सौ. नीता गायकवाड यांनी इंटरॅक्ट क्लबचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता अत्रे यांनी केले. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूडच्रूा प्रेसिडेंट गायत्री लडकत, समन्वयक रो. सुषमा कुलकर्णी, सेक्रेटरी रो. उमेश कुलकर्णी, चेअरमन माधवी कुलकर्णी, रो. मधुरा मॅडम, रो. विजा रायकर इ. मान्यवर उपस्थित होते. यानंतर विद्यार्थ्यांनी सुंदर श्रावण गीत सादर केले.
 
 
इंटरॅक्ट क्लबचे पास्ट प्र्रेसिडेंट नकुल मेळेगिरी यांनी मागील वर्षीही विद्यार्थ्यांसाठी क्लबतर्फे अतिशय उपयुक्त कार्यक्रम घेतल्याचा अनुभव सांगितला. नंतर यावर्षीचा इंटरॅक्ट क्लब इंस्टॉलेशन कार्यक्रम सर्व मान्यवरांच्या हस्ते पार पडला. निवड झालेल्या सर्व कमिटी मेंबर्सला रोटरीच्या मान्यवरांच्या हस्ते बॅज देण्यात आले. यानंतर नवनिर्वाचित प्रेसिडेंट खाजाअली सय्यद यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रेसिडेंट या नात्याने एकमेकांच्या सहकार्याने सर्व उपक्रम व्यवस्थित पार पाडू असा विश्वास व्यक्त केला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता अत्रे यांनी रोटरीने केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले व सध्या शाळेला विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाची अद्ययावत माहिती मिळण्यासाठी रोबोटिक लॅबची गरज असल्याचे सांगितले.
 
प्रेसिडेंट गायत्री लडकत यांनी विद्यार्थ्यांनी शाळेकडून व रोटरीकडून मिळालेल्या मदतीचा स्वत:च्या प्रगतीसाठी उपयोग करावा, असे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांची प्रगती दिसली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. सेक्रेटरी रो. उमेश कुलकर्णी यांनीही विद्यार्थ्यांना मोबाइल वापराशी संबंधित एक उपक्रम सुरू करण्यास सांगितले, तर रो. विजा रायकर यांनी विद्यार्थ्यांसाठी वर्षभर नवे उपक्रम राबवण्याचा मानस असल्याचे सांगितले. या कार्यक्रममाचे सूत्रसंचालन इंटरॅक्ट क्लबची सेक्रेटरी कु. सई मोडक हिने केले. तर ,कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इंटरॅक्ट क्लबची मेंबर कु. नंदिनी जाधव हिने केले.