तरुणसागरजी

    09-Jul-2025
Total Views |
 

tarunsagarji 
 
तरुणसागरजीपितृ देवाे भव। वडील देव आहेत. आईची माया धरणी- मातेपेक्षाही महान आहे आणि वडिलांचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे. जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही; परंतु एक वडीलच असे आहेत की, जे आपल्या मुलाला आपल्या-पेक्षाही पुढे गेलेला पाहून आनंदी हाेतात. देशाच्या तरुणांनाे, तुमच्या पाकिटात पैशांऐवजी वडिलांचा ाेटाे ठेवा. झाड भले जुने हाेऊ दे, अंगणातच राहू द्या. येता जाता ती सावली तुमच्या अंगावर पडू द्या. मायेच्या सावलीला पारखे हाेऊ नका