अशा माणसासाठी बुद्धांनी जे सूत्र सांगितले आहे ते म्हणजे - सम्यकस्मृती, राईट माइंडुलनेस. या गाेष्टीची जागरूकता, की हा क्राेध आहे, हे प्रेम आहे. हा तिरस्कार आहे. हे जे काय मी करत आहे त्याच्याबद्दल सतत एकाग्रतेने जागरूकता. त्याची पूर्ण स्मृति. जाे काेणी आपल्या भावांप्रती अशी जागरूकता ठेवू शकेल, एकाग्र स्मृतीला प्राप्त हाेऊ शकेल आणि समजू शकेल की हे प्रेम आहे, तर ताे चकित हाेऊन जाईल. कारण, प्रेमासाेबतच तिरस्कार असल्याचे त्याला दिसून येईल. त्याचे प्रेम पारदर्शक हाेऊन जाईल, त्यातून त्याला पलीकडील घृणाही दिसून येईल. तसेच त्याला क्राेधापाठाेपाठ असलेला पश्चात्ताप आणि क्षमाही दिसून येईल. सगळे भाव पारदर्शी हाेऊन जातील.भाव ार पारदर्शी असतात - काचेसारखे! वासना अपारदर्शक असतात - दगडासारख्या! त्यातून काहीही दिसत नाही.
वृत्ती ार भरलेल्या असतात, तर भाव ार तरल असतात. अगदी झिरझिरीत वस्त्रासारखे, त्याच्या आरपार दिसू शकते. वृत्तींच्या मधाेमध उभे रहाल तरच द्वार मिळेल, ते दाेन दगड आहेत. पण भावाप्रती आपण सजग झालात, तर त्यातून आपल्याला आरपार दिसू शकेल. विचारांबद्दल सजगता, भावांप्रती स्मृती, वासनांप्रती समत्व. या तिन्हींचा परिणाम एकच हाेईल, तीन प्रकारचे लाेक पृथ्वीवर आहेत, म्हणून हे भेद आहेत. परिणाम मात्र एकच असेल. निर्विचार व्हा, वा निर्भाव व्हा, वा नि:संकल्प व्हा. मग जे उरेल, ते निराकार असेल.आपण एकाच गंगेत सूर माराल, पण वेगवेगळ्या घाटांवरून. घाट आपला असेल, वेगवेगळा-जाेवर आपण घाटावर उभे आहात, ताेवर फरक असेल, पण गंगेत उडी मारली की मग काहीच फरक असणार नाही.