जेणें संग्रामीं हरू जिंतिला। निवातकवचांचा ठावा ेडिला। ताे अर्जुन माेहें कवळिला। क्षणामाजीं।। (1.200)

    04-Jul-2025
Total Views |
 
 

saint 
 
युद्धभूमीवर आपलेच बांधव पाहून अर्जुनाच्या मनात करुणा उत्पन्न झाली.चंद्राच्या प्रकाशाने जसा साेमकांत मणी पाझरताे, त्याप्रमाणे अर्जुनाचे चित्त द्रवू लागले. स्वजनांच्या प्रेमाने व्याकुळ हाेऊन ताे श्रीकृष्णांना म्हणाला, ‘‘कृष्णा, युद्ध करणारे हे आप्तजन पाहून माझे अवयव शिथिल झाले आहेत. ताेंडाला काेरड ुटली आहे.शरीराला कंप निर्माण झाला आहे. अंगावर राेमांच उभे राहिले आहेत. हातातील धनुष्य गळून पडले आहे. माझे चित्त भ्रमिष्टासारखे झाले असल्यामुळे माझ्या हातून आता युद्ध हाेणार नाही. त्यांच्याशी मी युद्ध कसे करावे? युद्ध या कल्पनेनेच माझे भान नष्ट झाले आहे. मन व बुद्धी ठिकाणावर नाहीत.सर्व शरीर थरथर कांपत आहे. ताेंडाला काेरड पडली आहे. सर्व शरीरावर कांटा उभा राहिला आहे. मला माझाच राग येऊ लागला आहे. धनुष्य ज्या हातात आहे ताे ढिला पडला आहे.
 
अशा रीतीने माझे मन स्वजनांच्या प्रेमाने घेरले आहे. वज्रापेक्षाही फ ुटण्याला कठीण असा स्वजनांचा माेह टाळणे किती अवघड आहे हे ध्यानांत येऊन मला नवल वाटले.’’ अर्जुनाची ही मनस्थिती श्रीकृष्णांनी जाणली. अर्जुन हा केवढा माेठा पराक्रमी? त्याने निवातकवच नावाच्या राक्षसांचा पराभव केला.हे निवातकवच काेण? तर प्रल्हादाचा भाऊ संऱ्हाद, याचे हे पुत्र. हे इंद्रालाही अजिंक्य हाेते आणि त्यांची मैत्री रावणाशी हाेती. अशा या निवातकवचांचा नाश ज्या अर्जुनाने केला, त्याला माेहाने ग्रासले.याच अर्जुनाने युद्धांत शंकरांनाही जिंकले. हा अर्जुन आज असा माेहग्रस्त कसा झाला? भुंगा काेणतेही कठीण लाकूड ाेडताे, पण कमळाच्या कळीत मात्र अडकून बसताे. अशी स्थिती अर्जुनाची झाली. ही परमेश्वराची मायाच हाेय हे संजयाने ओळखले.शेवटी अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला की आता मी ही युद्धभूमी साेडून रानावनात निघून जाता