ओशाे - गीता-दर्शन

    04-Jul-2025
Total Views |
 
 
 
Osho
 
इथे मला फक्त विचार न करता तलवार चालवायची साेय आहे. जिथे शत्रूची तलवार येणार आहे, तिथे माझी तलवार पाेहाेचली पाहिजे. त्यात विचाराची अडचण येता कामा नये.अर्जुन तर सामुराई आहे, त्याची सारी प्रक्रिया प्राणपणाने लढण्याची आहे.त्याच्या जीवनात वासना आहेत, पण विचाराचा जास्त प्रश्न नाहीये. म्हणून कृष्ण त्याला सांगत आहे की तू दाेन वासनांच्या मध्ये सम हाेऊन जा. अर्जुन दाेन वासनांच्यामध्ये सम झाला तर याेगारूढ हाेऊन जाईल. आईन्स्टाईनला याेगारुढ व्हायचे असेल, तर वासनांच्यामध्ये सम हाेण्याचा प्रश्नच येणार नाही. ताे म्हणेल वासना आहेतच कुठे? वासनांची खास अशी जाणीवही त्याला नाही.ताे एकदा एका मित्राकडे रात्री जेवायला गेला, अकरा वाजता जेवण झाले. मग बाहेर व्हरांड्यात बसून मित्राबराेबर गप्पा चालू झाल्या. आईनस्टाईन अनेक वेळा आपल्या घड्याळात पाहात हाेता. पण डाेके खाजवून ताे पुन्हा गप्पा मारू लागायचा, इकडे मित्राची मात्र पंचाईत झाली हाेती.
 
बारा वाजले, एक वाजला, बरं, ‘आता उठा, झाेपायची वेळ झाली.’ असे आईनस्टाईनसारख्या मित्राला म्हणण्याची बिचाऱ्या मित्राची हिम्मत पण हाेत नव्हती. त्याला याचे आश्चर्य पण वाटत हाेते की आईन्स्टाईनही पुन: पुन्हा घड्याळ पाहून डाेके खाजवून पुन्हा बसून राहत हाेता. ताे मित्र खूप वैतागला की हे घड्याळही पाहताहेत, त्यांना दाेन वाजल्याचेही ठाऊक आहे.मग शेवटी मित्राने विचारले, ‘आज झाेपायचे नाही की काय?’ यावर आईन्स्टाईन म्हणाला, ‘तेच तर म्हणताेय मी, म्हटलं, आता जाल, नंतर जाल, म्हणून मी पुन: पुन्हा माझ्या घड्याळाकडे सुद्धा पाहताेय’ मित्र म्हणाला, ‘कमाल आहे! घर तर माझे आहे, मी कुठे जाणार?’ यावर आईन्स्टाईन म्हणाला, ‘अरेच्या, असं आहे काय? मला माफ करा हं, मला भानच राहत नाही की घर कुणाचे आहे.. मी जाताे आता, पण इतका वेळ मी, तुम्ही केव्हा जाताय याचीच वाट बघत हाेताे खरा.’ आपले घर काेणते याचेही ज्याला भान राहत नाही ताे घर करण्याच्या वासनेने पछाडला जाणे शक्यच नाही. हा त्याचा प्रश्नच नाही