ओशाे - गीता-दर्शन

    03-Jul-2025
Total Views |
 
 
 

saint 
ज्यांचा जाेर वासनेवर असताे त्यांच्यासाठी कृष्ण जे म्हणताे ते ठीकच आहे.विचार करणारा माणूस नाही, इच्छा करणारा माणूस आहे.ताे याेद्धा आहे, त्याला विचारांशी ारसे घेणेदेणे नाही आणि ताे जर आईन्स्टाईनसारखा विचारात हरवून बसला तर ताे युद्ध करूच शकणार नाही. ‘विचार करू नका-लढा’ हेच तर युद्धाचे सूत्र आहे. विचार केला तर लढणे अवघड हाेऊन बसेल, मग नक्कीच पराभव हाेईल.जाे माणूस विचार करीत नाही, जाे समग्रतेने लढताे, जाे अजिबात विचारच करत नसताे, ताेच माणूस युद्ध जिंकताे.जपानमध्ये लढवय्यांची एक जमात आहे-सामुराई.सामुराई शिक्षक असे शिकवत असतात की एक क्षण जरी तुम्ही विचारात घालवला तरी जीवाला मुकाल. तलवार चालवा, विचार करू नका. जेव्हा लढत असता तेव्हा तलवार चालवा. विचार करू नका. थाेडासा जरी विचार कराल तरी तेवढ्या वेळात तलवार चुकेल, मग त्या अवधीत शत्रू तुमच्या छातीत तलवार खुपसून टाकेल.त्यामुळे दाेन सामुराई जेव्हा तलवारीच्या द्वंद्वात उतरतात, तेव्हा काेण जिंकला अन् काेण हरला हे ठरवणे ार अवघड हाेऊन बसते. कारण दाेघेही निर्विचाराने लढत असतात. एका अर्थाने, विचार अजिबात नसताे.
 
सरळ लढाई असते आणि त्यांचे लढणे माेठे प्राणगर्भ, इन्ट्यूटिव्ह असते. कारण कुठे घाव घालायचा असा विचार केलेला नसताे. पूर्ण प्राणपणाने वाटते की, येथे घाव घाल-तेथेच घाव घातला जाताे. घाव घालणे अन् विचार करणे यात अंतर अजिबात नसते, घाव हाच विचार असताे.आणि माेठी आश्चर्याची गाेष्ट आहे की, सामुराई याेद्ध्यांचा अनुभव असा आहे की शत्रू जेव्हा हल्ला करताे तेव्हा ताे जिथे घाव घालणार असताे-बराेबर तिथेच पुऱ्या प्राणपणाने बचावरूपाने तलवार उगारली जाते. विचार करीत बसायला वेळच नसताे, वावच नसताे. विचार म्हटले की काळाचा अवधी आलाच.समजा तुम्ही माझ्यावर तलवार उगारून चालून आलात, अन् मी जर विचार करीत राहिलाे की हा आता कुठे हल्ला करणार-मानेवर की छातीवर की कंबरेवर, तर एवढा विचार हाेईपर्यंत तुमची तलवार माझी मान कापून माेकळी पण हाेईल. कारण ती खूप वेगात असेल. तिथे विचार करायला संधी नसते.